लातूरमध्ये सीआयडी प्रमुखांच्या वडिलांच्या डोक्यात दगड घालून हत्या
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर | 06 Apr 2016 04:58 AM (IST)
लातूर: लातूरमध्ये सीआयडी प्रमुखांच्या वडिलांच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना खळबळजनक घटना घडली आहे. आयपीएस अधिकारी प्रसाद अक्कानवरु यांचे वडील प्रल्हाद अक्कानवरु यांचा काल पहाटे अज्ञात व्यक्तीनं खून केल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील बोथी रोडवर काल पहाटे प्रल्हाद अक्कानवरू (वय ७५) हे झोपले असताना अनोळखी इसमाने त्याच्या अंगावर दगड घालून त्याचा खून केला. चाकूरच्या बोथी रोड वर त्यांच्या मुलाचे दुकान आहे त्याच्या समोर प्रल्हाद अक्कानवरू हे झोपले होते. दरम्यान, पहाटेच्या वेळी त्यांच्या अंगावर दगड घालून त्यांनी त्यांची हत्या करण्यात आली. या खुनाचं नेमकं कारण काय? याची सध्या पोलीस माहिती घेत आहेत. प्रल्हाद अक्कानवरू हे नागपूर सीआयडी विभागाचे आय पी एस अधिकारी प्रसाद अक्कानवरू यांचे वडील होते. चाकूरसारख्या ग्रामीण भागात, बोथी रोडवरील कायम माणसांचा राबता असलेल्या ठिकाणी अशी घटना घडल्याने पोलिसांबरोबरच सर्वासामान्य चाकूरकर देखील हादरुन गेले आहेत.