सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत पहिल्यांदाच भाजपचा महापौर विराजमान झाला आहे. भाजपच्या संगीता खोत यांची महापौरपदी निवड झाली आहे. तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची नेमणूक झाली आहे. सांगली महापालिकेचं महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे.
महापौरपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार वर्षा अमर निंबाळकर यांना 35 मतं पडली. तर भाजपकडून संगीता खोत यांना 42 मतं मिळाली. तसंच उपमहापौरपदासाठी भाजपकडून धीरज सूर्यवंशी 42 मते पडली तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून स्वाती पारधी यांना 35 मतं पडली.
विजयी उमेदवारांची यादी
यावेळी स्वाभिमानी विकास आघाडीचे एकमेव नगरसेवक आणि माजी उप महापौर विजय घाडगे यांनी कोणालाच मतदान केलं नाही.
दरम्यान, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर जल्लोष न करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.
सांगलीत भाजपची मुसंडी
सांगली महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला चारीमुंड्या चित करत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या. सांगली महापालिकेतील एकूण 78 जागांपैकी भाजपने 41 जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला 35 जागांवर विजय मिळवण्यात यश आलं आहे. तर इतरांना दोन जागा मिळवता आल्या.
सांगली महापालिका पक्षनिहाय आकडेवारी
भाजप- 41
काँग्रेस- 15
राष्ट्रवादी- 20
इतर -2
एकूण- 78
संगीता खोत सांगलीच्या नव्या महापौर, तर धीरज सूर्यवंशी उपमहापौर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Aug 2018 01:17 PM (IST)
दरम्यान, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर जल्लोष न करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -