जळगाव : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला आहे. निवडणुकीत माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे पुन्हा एकदा वर्चस्व बघायला मिळाले.
मुक्ताईनगर नगरपंचायतीत नगराध्यक्ष पदासह 17 पैकी 13 जागांवर भाजपने दणदणीत विजय मिळवला. भाजपला सर्वाधिक 13, शिवसेनेला 3 आणि अपक्षांना एक जागा मिळाली.
मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या नजमा तडवी या विजयी ठरल्या आहेत. दुसरीकडे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला या निवडणुकीत एकही जागा मिळालेली नाही.
‘सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन ही निवडणूक लढवली, गेल्या तीस वर्षांपासून कार्यकर्त्यांनी केलेल्या विकास कामांवर भाजपला यश मिळालं,’ असं माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विजयानंतर म्हटलं आहे.
या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. कारण एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागल्याचं पाहायला मिळालं होतं. पुन्हा एकदा खडसेंना गड राखण्यात यश आल्याने भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.
दरम्यान,काही दिवसांपासून खडसे यांनी या निवडणुकीवर आपले लक्ष केंद्रित केलेलं होतं. महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना मात्र खडसे यांनी मुक्ताईनगर येथे तळ ठोकला होता.
या निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला भाजप अशी ही लढत होती.
खडसेंनी गड राखला, नगरपंचायत निवडणुकीत दणदणीत विजय
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Jul 2018 06:58 PM (IST)
‘सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन ही निवडणूक लढवली, गेल्या तीस वर्षांपासून कार्यकर्त्यांनी केलेल्या विकास कामांवर भाजपला यश मिळालं,’ असं माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विजयानंतर म्हटलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -