मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या वारसांना संधी देण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वारस रणजित सावरकर यांना आमदारकी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत रणजित सावरकर यांचा समावेश होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Continues below advertisement

संघ आणि दिल्लीतील नेत्यांची रणजित सावरकर यांच्या नावाला पसंती असल्याची माहिती असून रणजित सावरकर यांना संधी देऊन हिंदुत्व अधिक बळकट करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या नावाला सहमती देतील अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. 

महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या काळात 12 नावांची यादी राज्यपालांकडे दिली होती. राज्यपालांनी त्यावर कोणताही निर्णय घेतला नव्हता. आता राज्य सरकार बदलल्यानंतर नव्या सरकारकडून नवी यादी राज्यपालांना देण्यात येणार आहे. 

Continues below advertisement

रणजित सावरकर यांच्याविषयी थोडक्यातरणजित सावरकर हे व्यवसायाने इंजिनियर आहेत. सुरुवातीला त्यांनी महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये सहाय्यक प्रबंधक म्हणून काम केले. आपद व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री ते जिल्हाधिकारी यांच्यात थेट व्हिडीओ संपर्क व्हावा यासाठी स्थापन केलेल्या उपग्रह संपर्क यंत्रणेच्या संरचनेत त्यांचा मोलाच्या सहभाग होता.

रणजित सावरकर यांनी 'सावरकर स्मारक डॉट कॉम' या संकेतस्थळाची निर्मिती केली. त्यावर सावरकरांचं मराठी आणि इंग्रजी साहित्य निःशुल्क उपलब्ध आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी 12 भारतीय भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आलेले सावरकर साहित्य स्मारकाच्या संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध होईल. आता ब्रेल लिपीतही सावरकर साहित्य उपलब्ध आहे.

महत्त्वाच्या बातम्या: