बंगळुरु: Dolo-650 हे औषध बनवणाऱ्या बंगळुरुतील मायक्रो लॅब्स लिमिटेड (Micro Labs Limited) कंपनीवर आज आयकर विभागाने (Income Tax  Department) छापेमारी केली आहे. आयकर विभागाच्या 20 अधिकाऱ्यांच्या टीमने ही छापेमारी केल्याचं सूत्रांनी सांगितलं. कर चोरी प्रकरणी ही छापेमारी केली जात असल्याचं समोर आलं आहे. 


मायक्रो लॅब्स लिमिटेड (Micro Labs Limited) कंपनीच्या देशभरातील 40 ठिकाणच्या कार्यालयांवर एकाच वेळी छापेमारी केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामध्ये दिल्ली, सिक्कीम, पंजाब, तामिळनाडू, गोवा या ठिकाणच्या कार्यालयांचा या छापेमारीमध्ये समावेश आहे. तसेच मायक्रो लॅबचे सीडीएम दिलीप सुरीना आणि डायरेक्टर आनंद सुराना यांच्या घरावरही ही छापेमारी करण्यात आली आहे. बंगळुरुमधील रेस कोर्स रोडवरच्या कार्यालयातील छापेमारीमध्ये आयकर विभागाने महत्त्वाची कागदपत्रं जप्त केल्याची माहिती आहे. 


कोरोनाच्या काळात त्यावरील उपचारासाठी Dolo-650 चा खप मोठ्या प्रमाणावर झाला होता. या काळात कंपनीने एकूण 350 कोटी टॅबलेट्सची विक्री करुन एकाच वर्षामध्ये 400 कोटी रुपयांचा महसूल कमावला होता. या टॅबलेट्स विक्रीचा हा एक विक्रमच आहे. 


पॅरासिटॅमॉल टॅबलेट्सला पर्याय म्हणून Dolo-650 टॅबलेट्स पुढे आले. कोरोना काळात त या टॅबलेट्सची विक्री आणि सोशल मीडियावर तशीच मोठ्या प्रमाणात चर्चा  झाल्याचं दिसून आलं. 


 






महत्त्वाच्या बातम्या: