नांदेड : नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत यंदा भाजप पहिल्यांदाच दमदारपणे उतरले आहे. कधी नव्हे ते नांदेड शहरात सर्वत्र भाजपचे बॅनर झळकताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यावेळी भाजपला 81 पैकी 81 जागांवर उमेदवार देखील उपलब्ध झाले आहेत.


भाजपने नांदेड शहरातील एक भव्यदिव्य असे मंगल कार्यालय एका महिन्यासाठी भाड्याने घेतले आहे. हे मंगल कार्यालय अत्यंत महागडे आहे.

भाजपने एवढे महागडे मंगल कार्यालय एक महिन्यासाठी घेतल्याने सध्या शहरात अनेक चारही सुरु आहेत. महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे एवढा पैसा आला कुठून असा सवाल उपस्थित होतो आहे.

भाजपच्या बचावासाठी शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील आले असून भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. शिवाय एखादी ‘ड’ वर्गाची महापालिका निवडणूक लढवण्यासाठीही पक्षाकडे पैसा नसेल तर तो पक्ष काय कामाचा असा प्रतिसवल उपस्थित केला आहे.

भाजपने जे मंगल कार्यालय भाड्याने घेतले आहे, ते कार्यालय सध्या लग्नाचा हंगाम नसल्याने रिकामे होते म्हणून भाजपला अत्यंत कमी भाडे देऊन हे कार्यालय मिळाले, असे प्रताप पाटील यांनी सांगितले.