प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 17 Feb 2017 10:33 PM (IST)
नाशिक : बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांविरोधात नाशकात भाजपने शिस्तभंगाची कारवाई केली आहे. बंडखोरी करणाऱ्या 24 जणांचं भाजपने पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबन केलं असून त्यांचं सदस्यत्वही रद्द करण्यात आलं आहे. नाशिकमध्ये भाजपाने अधिकृत उमेदवारांची घोषणा केल्यानंतरही महापालिका निवडणुकीत आपली उमेदवारी कायम ठेवून पक्षाविरूद्ध बंडखोरी केल्याने शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. तिकीट वाटपावरुन इतर शहरांप्रमाणेच भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली होती. अनेकांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. मात्र पक्षाने अधिकृत यादी जाहीर करुनही नाव मागे न घेतलेल्या उमेदवारांची भाजपने पक्षातून हकालपट्टी केली आहे. निलंबन झालेले उमेदवार :संबंधित बातम्या :