मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने ग्रासल्याच्या बातम्या निव्वळ निराधार असल्याचा दावा स्वत: अमित आणि शर्मिला ठाकरे यांनी केला आहे.

mymedicalmantra.com या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत अमित ठाकरेंनी आपण अगदी फिट अँड फाईन आहोत, आणि मुंबई पालिकेसाठी सक्रीय प्रचार करत असल्यचंही म्हटलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सुरु असलेल्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

अमित ठाकरेंचं स्पष्टीकरण

''सोशल मीडियावर मला कॅन्सर असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. पण तसं काहीही नाही.


मी माझ्या टीमसोबत अगदी सक्रिय आहे.


नुकतंच लाँच केलेलं फेसबुक पेजही ऑपरेट केलं जात असून राज ठाकरेंचं भाषणही त्यावर लाईव्ह दाखवलं जात आहे.


मी काही काळ आजारी होतो, हे खरं आहे,


पण गंभीर आजारानं ग्रासल्याच्या बातम्या निराधार असून मी सध्या मुंबई महापालिकेच्या प्रचारात सक्रियपणे सहभागी आहे''


अमित ठाकरे.


शर्मिला ठाकरेंचं स्पष्टीकरण

अमित ठाकरेंच्या आई शर्मिला ठाकरे यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. अमितची प्रकृती चांगली असून तो सध्या प्रचारात व्यस्त आहे. पण अशा अफवा पसरवणाऱ्यांना काय मिळतं, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.