Ashish Shelar : राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप (BJP) आक्रमक होताना दिसत आहे. भाजपाचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. साडे तीन जिल्हा म्हणजे महाराष्ट्र होत नाही, 1993 च्या बॉम्बस्फोटाच्या जखमा अजून ताज्या आहेत. असं म्हणत शेलारांनी हल्ला चढवला आहे. ठाकरे सरकारकडून नवाब मलिकांचा त्वरित राजीनामा घेण्यात यावा या मागणीसाठी आज मुंबईत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नेतृत्वात विराट मोर्चा काढण्यात आला.


भाजपाचे प्रमुख नेते यावेळी आझाद मैदानात मोर्चासाठी हजर आहेत. यावेळी भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. आशिष शेलार म्हणाले की, ''1993 चा बाॅम्बस्फोट आम्ही अजूनही विसरलो नाही. 84 लोक बाॅम्बस्फोटात मारली गेले. बाॅम्बस्फोटाचा मास्टरमाइंड दाऊद होता. त्या बॉम्बस्फोटातील एक पीडित, तुषार देशमुख देखील आज आलाय. तुषार हा सद्ज्ञान देखील नव्हता. वरळी सेंचुरी बाजारजवळ टॅक्सीत स्फोट झाला आणि तुषारची आई जवळून खाक झाली. मुंबईसाठी तुषारची आई शहीद झाली आणि त्यानं आपलं नाव तुषार प्रीती देशमुख असं लावायला सुरुवात केली. दुःख हे आहे की मेमन ज्याला फाशी झाली, त्याचे पार्थिव ओळखू येईल असं होतं मात्र आम्हाला पार्थिवाचं दर्शन घेता आलं नाही.''


पुढे शेलार म्हणाले की, ''मंत्रिमंडळात एक व्यक्ती अशी आहे जी मेमनला फाशी देऊ नका म्हणाली होती. त्या व्यक्तीचं नाव काय अस्लम शेख. उद्धवजी तुम्ही त्याच्या मांडीला मांडी लावून बसता आणि महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही म्हणता. साडे तीन जिल्हा म्हणजे महाराष्ट्र होत नाही.'' झोपी गेलेल्या सरकारला जागं करायचंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना इशारा द्यायचाय, असंही शेलार म्हणाले.


पाहा व्हिडीओ : 3 तासात 12 बॉम्बस्फोट झाले, याचा मास्टरमाईंड दाऊद होता : आशिष शेलार



 


महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha