Indurikar Maharaj : कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी मोबइल क्लिपचा चांगलाच धसका घेतला आहे. इंदुरीकर महाराज यांनी आपल्या एका कीर्तनाच्या दरम्यान उपस्थित असलेल्यांना मोबाइल बंद करण्यास सांगितले. आता त्याचाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
आपल्या कीर्तनाच्या व्हिडीओ क्लिप्स युट्युब वर टाकून अनेक जण पैसे कमवतात आणि त्यांच्यामुळे आपल्याविरोधात तक्रारी दाखल झाल्याचे वक्तव्य इंदूरीकर महाराज यांनी केले होते. व्हिडिओ रेकोर्ड करून त्याची कमाई करणाऱ्यांची मुले दिव्यांग म्हणून जन्माला येतील असेही त्यांनी म्हटले होते. इंदूरीकर महाराज यांचे हे वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर त्यांनी आता मोबाइलचा धसका घेतला आहे.
मंगळवारी, बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील कासारी बोडखा गावात इंदूरीकर महाराज यांचं कीर्तन होतं. या कीर्तन सोहळ्यात इंदूरीकर महाराज यांनी उपस्थित असलेल्या लहान मुलांसोबत आपल्या शैलीत संवाद साधण्यास सुरुवात केली. त्यांनी मुलांना शाळा सुरू झाली का, ऑनलाइन शिक्षण झाले का, आदी प्रश्न विचारले. ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेतले की मोबाइलवर गाणी ऐकली, असा प्रश्न विचारला. त्यावर मुलांनी गाणी ऐकली असे म्हटले. ऑनलाइन शिक्षणाबाबत आपण हेच बोललो असतो तर लोकांनी टीका केली असती असे इंदूरीकर महाराजांनी म्हटले.
इंदूरीकर महाराज यांच्या कीतर्नाचे काहीजणांकडून मोबाइलवर चित्रीकरण सुरू होते. त्याच वेळी त्यांचे लक्ष या मोबाइलधारक तरुणांकडे गेले. त्यानंतर इंदूरीकर महाराज यांनी मोबाइल बंद करण्यास सांगितले. इंदूरीकर महाराजांच्या आवाहनानंतर आयोजकांनी मोबाइल बंद करण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
त्यांची मुले दिव्यांग म्हणून जन्माला येतील
आपल्या कीर्तनाच्या व्हिडीओ क्लिप बनवून यूट्यूबवर अपलोड करुन चार हजार लोक कोट्यधीश झालेत, त्यांच्यामुळेच आपण अडचणीत आलो असून अशांची मुलं दिव्यांग जन्माला येतील असं वादग्रस्त वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी केलं आहे. अकोला शहरातील कौलखेड भागात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी इंदुरीकर महाराजांचे कीर्तन अयोजित केलं होतंय. त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्यं केलं.
इंदुरीकर महाराज म्हणाले की, "आपल्या कीर्तनाचे व्हिडीओ अपलोड करून आतापर्यंत चार हजार लोकांनी यू्ट्यूबवर कोट्यवधी रुपये कमावले आहेत. त्यांच्यामुळेच मी अडचणीत आलो आहे. आपल्या कीर्तनाच्या व्हिडीओ क्लिप्स यूट्यूबवर टाकणाऱ्यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील. "
पाहा: माझ्या किर्तनाचे व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करणाऱ्यांची मुलं दिव्यांगं जन्माला येतील