लातूर : भाजप अध्यक्ष अमित शाह बूथ विजय अभियानच्या निमित्ताने लातूर दौऱ्यावर आले होते. त्यांच्या स्वागतासाठी शहरात जागोजागी बॅनर लावण्यात आले होते. मात्र भाजपाला दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा विसर पडताना दिसून आला. कारण मुंडे यांचा फोटो बॅनरवर कुठेही दिसला नाही.
मराठवाड्यातच नव्हे तर राज्यात भाजपला तळागळातील लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम गोपीनाथ मुंडे यांनी केले होते.ओबीसी समाजाला भाजपाबरोबर जोडण्याचे काम मुंडेंनी केले होते. त्यांना मानणारा मोठा गट भाजपात सक्रिय आहे. असे असतानाही आज झालेल्या कार्यक्रमात कुठेही बॅनरवर गोपीनाथ मुंडे यांचा फोटो पाहायला मिळत नाहीये.
लातुरात आज झेंडा ही थीम घेऊन शहरातील सर्व मुख्य रस्त्यावर झेंडे लावण्यात आले होते. त्यासह अनेक बॅनरही लावण्यात आले. त्यावर अटल बिहार वाजपेयी नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे यांचे फोटो आहेत. मात्र गोपीनाथ मुंडे यांचा फोटो कुठेच नाही, याचे दु:ख मुंडे समर्थकात असणार.
भाजपकडून बॅनरबाजी, मात्र गोपीनाथ मुंडेंना स्थान नाही
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर
Updated at:
06 Jan 2019 09:09 PM (IST)
भाजप अध्यक्ष अमित शाह बूथ विजय अभियानच्या निमित्ताने लातूर दौऱ्यावर आले होते. त्यांच्या स्वागतासाठी शहरात जागोजागी बॅनर लावण्यात आले होते. मात्र भाजपाला दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा विसर पडताना दिसून आला. कारण मुंडे यांचा फोटो बॅनरवर कुठेही दिसला नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -