Sushilkumar Shinde on Loksabha Election : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या लोकांनीही प्रणिती शिंदेंना (Praniti Shinde) मतदान केलं असल्याचा  गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी केला आहे. सोलापुरात (Solapur) आयोजीत केलेल्या कृतज्ञता मेळाव्यात ते बोलत होते. त्यामुळे शिंदेंना मतदान करणारे भाजपचे लोक कोण? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.


विरोधकांनी पैसे वाटल्याचा आरोप


सोलापूरच्या जनतेने निवडून दिल्याबद्दल, तसेच मित्रपक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्याच्या वतीने सोलापूर लोकसभा मतदारसंघात कृतज्ञता मेळावे घेतले जात आहेत. काल सोलापुरातील अक्कलकोट रोडवरील मंगल कार्यालयात घेतलेल्या कृतज्ञता मेळाव्यात ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी विरोधकांनी पैसे वाटल्याचा आरोपही शिंदेंनी केला. विविध तीन चार पक्षाचे लोक आपापल्या परीने सामील झाले होते. मी नऊ दहा निवडणुका लढवल्या. मात्र, या निवडणुकीत कुठल्याही पद्धतीचा त्रास झालेला नाही.
सगळे लोक अगदी आनंदाने काम करत होते असेही शिंदे म्हणाले.


आमच्याकडे कोणीही पैशांची मागणी केली नाही


आमच्याकडे कोणीही पैशांची मागणी केली नाही असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले. आपापले पैसे खर्च करुन लोक प्रयत्न करत होते. आम्हाला बातम्या येत होत्या की, विरोधी पक्ष अमुक ठिकाणी पैसे वाटायला लागले आहेत. अमुक ठिकाण पाकीट झालेली आहेत. पैसे वाटत आहेत. पण आम्ही त्याचीही कधी परवा केलेली नाही असे शिंदे म्हणाले. विजयाचा उन्माद मांडणारे नव्हे तर खाली मान घालून विजय स्वीकारणारे आम्ही असल्याचे शिंदे म्हणाले. 


मागील 10 वर्षात सोलापूरचे नुकसान


विजयाचा उन्माद मांडणारे आम्ही लोक नाहीत. विजय देखील आम्ही मान खाली घालून स्वीकारतो असे शिंदे म्हणाले.  मी सगळ्या नेत्यांचे आभार मानतो. आडम साहेब, दासरी आणि जाधव साहेब असतील. सगळे निरनिराळ्या पक्षाचे सहकारी त्यांनी अतिशय तत्वाने काम केल्याचे सुशीलकुमार शिंदे म्हणाले. उघडपणानं ज्यांना शक्य आहे त्यांनी केलं. बाकीचे, आता सगळं सांगायचं मला कठीण आहे असंही शिंदे म्हणाले. भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी देखील प्रणिती ताईंना मतदान केल्याचे सुशीलकुमार शिंदे म्हणाले. अनेकांनी सांगितलं की अशी नेता निवडून आली पाहिजे. आमच्या सोलापूरचे मागील दहा वर्ष नुकसान झाले आहे. प्रणितीताईसारखी एक पावरफुल नेता पार्लमेंटमध्ये पाठवू या, असा त्यांनी निर्णय घेतल्याचे शिंदे म्हणाले.


महत्वाच्या बातम्या:


योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना