विधानपरिषद : भाजपने खातं उघडलं, गोंदियात परिणय फुके विजयी
विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे चंदू पटेल विजयी झाले. त्यानंतरच्या जल्लोषात भाजप कार्यालयासमोरच चक्क नोटांची उधळपट्टी करण्यात आली. भाजप कार्यकर्त्यांनी 10 ते 20 रुपयांच्या नोटा यावेळी उधळल्या. मात्र यात 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा नसल्याचं कळतं.
त्यामुळे एकीकडे देशभरात चलन तुटवडा असताना जळगावमधील उधळपट्टी नक्कीच चक्रावून सोडणारी आहे. देश बदलण्यासाठी सरसावलेल्या नरेंद्र मोदींचा संदेश भाजप कार्यकर्त्यांपर्यंतच पोहोचलेला नाही हे या प्रकारावरुन स्पष्ट होतं आहे.
भाजपचा दावा
मात्र उधळलेल्या नोटा खऱ्या नसून खेळण्यातल्या आहेत, त्या नोटा फटाक्यासोबतच येतात, असा दावा चंदू पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
पुणे: मतं होती 298, मिळाली 440, राष्ट्रवादीचा गेम प्लॅन यशस्वी
दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत जळगावमध्ये भाजपचे चंदू पटेल 331 मतांनी विजयी झाले. त्यांना 421 मतं मिळाली. पटेल यांनी अपक्ष उमेदवार विजय भास्कर पाटील यांना पराभूत केलं. पाटील यांना केवळ 90 मतं पडली.