शिर्डी : अहमदनगरमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. करण ससाणे यांनी अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपदाचा राजीनाा दिला आहे. तसंच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचं काम करणार नाही, तठस्थ राहणार अशी भूमिका करण ससाणे यांनी घेतली आहे. ससाणे आणि राधाकृष्ण विखे पाटील समर्थकांची आज शिर्डीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
विखे पाटील समर्थकांसोबत शिर्डीत झालेल्या संयुक्त बैठकीत करण ससाणे यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले की, "भाऊसाहेब कांबळे यांच्याबाबत आमची नाराजी होती. फक्त पक्षनिष्ठा म्हणून काम सुरु केलं. आम्ही सभा घेतल्या. पण एक घटना घडली, माझ्या वडिलांबद्दल अपशब्द काढले. त्यामुळे मी या निवडणुकीत काम करणार नाही, पक्षाविरोधातही राहणार नाही, तटस्थ राहणार. माझी पदावर राहण्याची इच्छा नाही."
दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील शेवटची सभा संगमनेरमध्ये होणार आहे. परंतु या सभेला राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार का याबाबतही साशंकता आहे. 27 एप्रिलला राजकीय भूमिका स्पष्ट करणार, असं राधाकृष्ण विखे पाटील यांचं सांगितलं आहे.
राधाकृष्ण विखे पाटील आज राजकीय भूमिका स्पष्ट करणार
निवडणुकीत पक्षाचं काम करणार नाही, तटस्थ राहणार; अहमदनगर काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Apr 2019 03:01 PM (IST)
विखे पाटील समर्थकांसोबत शिर्डीत झालेल्या संयुक्त बैठकीत करण ससाणे यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -