Nitesh Narayan Rane :  आपल्या राज्यामध्ये काही लोकांची जीभ जास्त चालायला लागली आहे. राऊतांच्या जीभेचे तर संशोधन करायला हवं असं माझं मत आहे. राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आपलं गुरू मानू नये आणि बोलू नये. हिंमत असेल तर त्यांनी आपल्या शब्दावर ठाम रहावं आणि पोलिसांचा गराडा बाजूला करा, मग जीभ कशी वापरायची हे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता दाखवेल, असं घणाघाती वक्तव्य भाजप नेते नितेश राणे यांनी केलं आहे. 


आशिष शेलार आणि महापौर पेडणेकर वादावर काय म्हणाले नितेश राणे?
शिवसेनेच्या युवा नेत्यांनी दिशा सालीयनचा मर्डर करावा, तिच्यावर अत्याचार करून तिला इमारतीवरून फेकलेल चालतं. शिवसेनेच्या मंत्र्यांनी पूजा चव्हाणच्या मृत्यूला जबाबदार असलेलं चालतं. आशिष शेलारांनी जे कधी म्हंटलच नाही ते या लोकांना चालत नाही. महिलांवरील अत्याचाराबद्दल शिवसेनेला बोलण्याचा अधिकार राहिला आहे का? यांच्या राज्यात महिला सर्वात असुरक्षित. कायदा आणि सुव्यवस्था यांचे धिंडवडे निघाले आहेत.शिवसेनेच्या महिलांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्या आपल्या या नेत्यांवर आक्षेप घ्यावा. घाणेरडं राजकारण करून जे बोललं नाही त्या वक्तव्यावर कशाला बोंबाबोंब करताय, असे नितेश राणे म्हणाले. 


... तर माफी मागायला तयार - नितेश राणे
इंपेरिकल डाटा हा राज्य सरकारने तयार करायचा आहे. त्यासाठी २०० ते ३०० कोटी हे राज्यसरकारने आपल्या अर्थखात्यातून द्यायचे आहेत. हे पैसे राज्यसरकारने का दिले नाहीत हे ओबीसींचे नेते छगन भुजबळ आणि विजय वडडेट्टीवार यांनी सांगावं. तो डाटा तयार न केल्यामुळे ओबीसी समाजाच्या उमेदवारांवर  मोठा अन्याय झाला आहे.मग नेमकं जबाबदार कोण आहे? छगन भुजबळ साहेबांना अजित दादांवर बोट उचलण्याची हिंमत आहे का?मराठा समाज,ओबीसी समाज यांचं अस्तित्व मिटविण्यासाठी सरकार प्रयत्न करतंय?छगन भुजबळ यांनी दिल्लीत बसण्यापेक्षा अजित दादांच्या घरी जाऊन बसले असते आणि त्यांच्याकडून 30 कोटी आणले असते तर आज ओबीसी समाजाच भलं झालं असतं. याच उत्तर छगन भुजबळ यांनी द्यावं. मी जर खोटं बोलत असेन तर ते जिथे सांगतील तिथे यायला तयार आहे आणि येऊन त्यांची माफी मागायला तयार आहे, असे नितेश राणे म्हणाले.