मुंबई : पक्षाविरोधात दंड थोपटणारे भाजप खासदार नाना पटोले शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्यासोबत 10 तारखेनंतर यवतमाळचा दौरा करणार असल्याचं नाना पटोले यांनी जाहीर केलं. दोघांमध्ये जवळपास अडीच तास चर्चा झाली.

शिवसेना घटकपक्ष असल्यामुळे त्यांची भेट घेतली. केंद्राच्या समितीची मागणी केल्यामुळे सर्व नेत्यांना भेटणार आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

नाना पटोले यांनी पुन्हा एकदा भाजपविरोधातच दंड थोपटले आहेत. येत्या 15 तारखेला भाजपमधल्या सर्व नाराज नेत्यांची मोट बांधून पुण्यात संमेलन घेणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी एबीपी माझाला दिली आहे.

यापूर्वीही नाना पटोलेंचा भाजपला घरचा आहेर

नाना पटोले यांनी शेतकरी कर्जमाफीवरुन सरकारवर हल्लाबोल केला होता. राज्य सरकारने सप्टेंबरपर्यंत कर्जमाफीसंदर्भात ठोस पावलं उचलावी अन्यथा आपण इतिहासाची पुनरावृत्ती करु शकतो, असं म्हणत नाना पटोले यांनी अप्रत्यक्षपणे राजीनाम्याचे संकेत दिले. पटोले यांनी 2009 मध्ये काँग्रेसमध्ये असताना कर्जमाफीच्या मुद्द्यावर स्वपक्षीयांवर हल्लाबोल करत आमदारकीचा राजीनामा दिला होता.

नोटाबंदी आणि जीएसटीवरुन भाजप खासदार नाना पटोले यांनी त्यांच्याच पक्षाला पुन्हा एकदा फैलावर घेतलं. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे व्यापाऱ्याचं कंबरडं मोडलं आहे. तर शेतकरीही अडचणीत आहेत. त्यामुळे व्यापारी, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी वेगळी चळवळ उभी करण्याचं नाना पटोले यांनी दसऱ्याच्या दिवशी बोलताना जाहीर केलं होतं.

संबंधित बातम्या :

तर इतिहासाची पुनरावृत्ती होईल, नाना पटोलेंचे राजीनाम्याचे संकेत


फडणवीस सरकार राष्ट्रवादीच्याच पाठिंब्यावर सत्तेत: नाना पटोले


पेट्रोल दरवाढ : भाजप खासदार नाना पटोले दिल्लीत जाब विचारणार


चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चीड आणणारं: नाना पटोले


चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवणं म्हणजे पक्षाला विरोध नव्हे : नाना पटोले