सांगली  : सांगलीतील वालचंद कॉलेजमधील एमटीईएस संस्थेच्या सत्तेवरून भाजप खासदार संजयकाका पाटील आणि जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यात तुंबळ वाकयुद्ध रंगलं.   आज संस्थेच्या वालचंद महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी जी.व्ही.परिषवाड यांची नियुक्ती झाल्याचं सांगत संजयकाका 700 कार्यकर्त्यांसह कॉलेजात घुसले, आणि प्राचार्यपद सांभाळणाऱ्या प्राचार्य पी. जे. कुलकर्णी  यांना बाजूला करून बळजबरीने परिषवाड यांना खुर्चीवर बसवलं.   त्यामुळं संस्थेचे सदस्य किंवा पदाधिकारी नसलेले संजयकाका पाटील हे अजित गुलाबचंद यांच्याकडून सुपारी घेऊन काम करत असल्याचा, आरोप पृथ्वीराज देशमुख यांनी केला.   तर संजयकाका यांनीही आरोपाला जशास तसं उत्तर देत गुंडगिरी आणि दहशतीच्या जोरावर देशमुखांनी अध्यक्षपद मिळवल्याचा आरोप संजयकाकांनी केला आहे.