Suresh Dhas : तत्कालीन पालकमंत्र्यांनी पाॅवर या अकाला दिले होती, त्यांनीच जील्ह्यातील बरेच आधीकारी आणले आहेत. सुदर्शन घुले हा वाल्मीक कराडच्या अंत्यत जवळचा कार्यकर्ता आहे. दोन कोटींमधील 50 लाख दोन महिण्यांपूर्वीच दिले आहेत, असा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत कराडच्या दहशतीचा पाढा वाचला. धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही तोफ डागली. सीडीआर काढल्यास कोण कोणाला काय बोललं ते कळेल, पण आता अका वाचणार नाही, असा शब्दात सुरेश धस यांनी तोफ डागली.
सगळ्यात जिल्ह्यात प्रदूषण परळी तालुक्यातील
सुरेश यांनी बीडमधील दहशतीचा मुद्दा मांडताना पर्यावरणाचा सुद्धा उल्लेख केला. सुरेश धस यांनी सांगितले की, परळीमधील राखे संदर्भात मी आज पत्र देणार आहे. पर्यावरण खातं सुद्धा आमच्या जिल्ह्यात असल्याचे सांगत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना पत्र सुरेश धस देणार आहेत. सगळ्यात जिल्ह्यात प्रदूषण परळी तालुक्यातील असून सिरसाळाजवळ 300 वीट भट्टी गायरान जमिनीवर असल्याचे धस यांनी सांगितले. दीडशे लोक हे माजी पालकमंत्री यांच्या घरातील लोक आहेत, ते राखेची वाहतूक करत असतात, असा दावाही धस यांनी केला.
तोपर्यंत मंत्रीपदावरून बाजूला करावे
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तपास पथकात काही लोकांची बदली वाल्मिक कराडने केली होती म्हणून आम्ही त्यांची नावे घेतली आहे. एसआयटीवर आमचा आक्षेप नाही यातील क्लास थ्रीमधील काही कर्मचाऱ्यावर आमचा आक्षेप असल्याचे सुरेश धस म्हणाले. करुणा मुंडेच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवणारा हा सुद्धा पोलीस दलातील व्यक्ती होता तो मला माहीत असल्याचा दावाही सुरेश धस यांनी केला. पोलीस दलात बिंदू नामावली प्रमाणे माहिती घेण्यासाठी पत्र दिले आहे. बिंदू नामावली प्रमाणेच जिल्ह्यात कर्मचारी राहणार असल्याचे ते म्हणाले. नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत त्यांना मंत्री पदापासून बाजूला करावे असे मला वाटते, असेही धस यांनी सांगितले.
दुसरीकडे, सुरेश धस यांनी सांगितले की, शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तेचा जरेवाडी पॅटर्न 13 तारखेपासून आष्टी विधानसभा मतदारसंघात राबवणार आहोत. आष्टी, पाटोदा, शिरूरमधील जिल्हा परिषदेच्या जागा या नगर पंचायतकडे वर्ग करण्याची प्रक्रिया आम्ही करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या