Nitesh Rane : संतोष परब हल्ल्या प्रकरणी नितेश राणेंच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयातील अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे थोड्याच वेळात सिंधुदुर्ग तपास अधिकाऱ्यांकडे नितेश राणे शरणागती पत्करणार आहे. कालच नितेश राणेंचा अटक पूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयानं फेटाळला होता. सर्वोच्च न्यायालयानं नितेश राणेंना अटकेपासून 10 दिवसांचं संरक्षण दिलं आहे.


न्यायालयाच्या निर्णयाचा आदेश ठेवून मी शरण जातोय : नितेश राणे 


नितेश राणे म्हणाले की, "काल सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयानं जो निर्णय दिला. त्या निर्णयाचा आदर ठेवून मी आता शरण जात आहे. आतापर्यंत राज्य सरकारनं वेगवेगळ्या पद्धतीनं, बेकायदेशीर पद्धतीनं मला अटक करण्याचा प्रयत्न केला. पण मी आज स्वतःहून न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवून शरण जात आहे."


पाहा व्हिडीओ : आमदार नितेश राणे सिंधुदुर्ग न्यायालयासमोर शरण



नितेश राणे यांना सुप्रीम कोर्टाचाही दिलासा देण्यास नकार, सिंधुदुर्ग न्यायालयात शरण जाणार 


भाजप आमदार नितेश राणे यांना सुप्रीम कोर्टानं मोठा धक्का दिला होता. सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात 10 दिवसात शरण येण्याचे आदेश दिले होते. मुंबई उच्च न्यायालयानं नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात नितेश राणे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. नितेश राणे यांना अटकेपासून 10 दिवसांचे संरक्षण मिळालं होतं. तसेच, नियमित जामीनासाठी राणे यांनी सत्र न्यायालयात अर्ज करावा असेही निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते. त्यानंतर नितेश राणे यांनी सिधुदुर्ग कोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता. परंतु, सिंधुदुर्ग हायकोर्टानंही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर पुन्हा एकदा नितेश राणे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. परंतु, अखेर आता त्यांनी जामीन अर्ज मागे घेतला असून ते सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात शरण जात आहेत. 


काय आहे प्रकरण?  


सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे वादाच्या भोवर्‍यात अडकले. 18 डिसेंबर 2021 रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


नितेश राणेंचा जामीन फेटाळल्यानंतर कोर्टाबाहेर निलेश राणेंचा दंगा, पोलिसांशी हुज्जत; गुन्हा दाखल


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha