BJP MLA Firing Live Updates : भाजपा आमदाराकडून शिवसेना नेत्यावर गोळीबार, 50 गुंठे जमिनीचा वाद

BJP MLA Firing Live Updates : उल्हासनगरमध्ये भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख यांच्या महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 Feb 2024 03:12 PM
Video: भाजपच्या गणपत गायकवाडांचा शिंदे गटाच्या महेश गायकवाडांवर गोळीबार, CCTV फुटेज समोर

Ulhasnagar BJP MLA Firing CCTV Video : Ulhasnagar Firing Case : कल्याण पूर्व विभागातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबाराचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता समोर आला आहे.


Ajit Pawar on Ulhasnagar Crime : उल्हासनगरमधील गोळीबारानंतर अजित पवार संतापले

कल्याण : उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar Crime) भाजप आमदार (BJP)  गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad)  यांच्याकडून गोळीबार करण्यात आलाय. हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच  गोळीबार  झाला. त्यानंकर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकप्रतिनिधींनी अशाप्रकारे कायदा हातात घेणं चांगलं नाही, यासंदर्भात फडणवीसांशी चर्चा करणार, अशी  प्रतिक्रिया  अजित पवारांनी (Ajit Pawar)  दिली आहे. 

Ulhasnagar Crime Live Updates : पोलिस अधिकाऱ्यासमोर धाडधाड सहा गोळ्या झाडल्या, नेमकं काय घडलं?

Ulhasnagar Crime News :  उल्हासनगरमध्ये (UlhasNagar Crime News) भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्याकडून गोळीबार करण्यात आला आहे. हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्ये गोळीबार  झाला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार केलाय. दरम्यान ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात महेश गायकवाड यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Chhagan Bhujbal : गोळीबार प्रकरणात सुप्रिया सुळेंच्या टीकेला छगन भुजबळांचे प्रत्युत्तर

Chhagan Bhujbal नाशिक : भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. यावरून खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली. पोलीस स्टेशनमध्ये फायरिंग होत असेल तर गृहमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. सुप्रिया सुळेंच्या टीकेवर मंत्री छगन भुजबळ (Chhagan bhujbal) यांनी प्रत्युतर दिले आहे. 

Ulhasnagar Firing Vijay Wadettiwar Reaction : तिन्ही पक्षात मारामारी होत असून हळूहळू एकमेकांचे मुडदे पडतील : विजय वडेट्टीवार 

Ulhasnagar Firing Live Updates : कायदा सुव्यवस्था सत्ताधाऱ्यांनी बिघडवली आहे. राज्यातील गुन्हेगारी वाढत आहे , सत्ताधारी आमदार कायदा हातात घेत असतील तर जनता काय करणार? पोलिसांच्या केबीनमध्ये गोळीबार होत असेल तर तो सराईत गुन्हेगार आहे. इतकी दादागिरी वाढली आहे. तिन्ही पक्षांत कोल्डवॉर सुरु आहे त्याची प्रचिती आता येत आहे. तिन्ही पक्षात मारामारी होत असून हळू हळू वाढत जाऊन एकमेकांचे मुडदे पाडतील. हे सर्व भूमाफिया आहे. नुसते पैसे कमावणे हेच या सरकारमध्ये सुरू आहे, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

Ulhasnagar Firing Live Updates : महाराष्ट्राची बदनामी गँगवॉर सरकारने केली : सुप्रिया सुळे

BJP MLA Firing Live Updates : महाराष्ट्र भरडला जातोय. वर्दीचा मान ठेवणारे आपण लोक आहोत. पोलीस स्टेशनमध्ये आम्ही माहेर म्हणून जातो की पोलीस आम्हाला हकक मिळवून देतील.  दिवसा ढवळ्या भांडणे होतात. आमदारांची हिम्मत कशी होते हे करण्याची? त्यांच्या पक्षाचा व्यक्ती आहे.  फडणवीसांना राजीनामा द्यावा लागेल. भाजपचा आमदार आहे म्हणून काहीही करेल का?मायबाप जनतेने कुणावर विश्वास ठेवावा, याची चौकशी झाली पाहिजे. पोलिसांसमोर हे होत असेल तर हे गुंडाराज आहे,  एवढी यांना सत्तेची मस्ती? गुंडराज नाही तर काय? असा सवाल देखील सुप्रिया सुळेंनी केला आहे.  महाराष्ट्राची बदनामी गँगवॉर सरकारने केली आहे

BJP MLA Firing Live Updates : फडणवीसांनी राजीनामा द्यावा; उल्हासनगर गोळीबार प्रकरणी सुप्रिया सुळे आक्रमक

Ulhasnagar Firing Supriya Sule Reaction : उल्हासनगरमध्ये (UlhasNagar Crime)  भाजप (BJP) आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्याकडून गोळीबार करण्यात आलाय. कायद्याचे रक्षक असलेल्या  हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच  हा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने हे कृत्य केले आहे. या प्रकरणावरुन राजकारण तापले असून विरोधक चांगलेच आक्रमक झाले. पोलिसांसमोर गोळीबार होत असेल तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा,अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली आहे.  तर महाराष्ट्रात गुंडाराज सुरु असल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. 

BJP MLA Firing Live Updates : सोशल मीडियामध्ये एकमेकांना चॅलेंज

BJP MLA Firing Live Updates : तीन ते चार महिन्यापूर्वी सोशल मीडियाच्या एका ग्रुपमध्ये आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांनी एकमेकांना विकास कामावरून आव्हान केले होते.  एकमेकांना विरुद्ध सोशल मीडियात टीका टिपणी केली होती त्याचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला.  महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांनी सोशल मीडियामध्ये एकमेकांना चॅलेंज केले तुम्ही केलेले विकासकामे हे जनतेसमोर मांडा असे आव्हान केले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ड वार्डमध्ये दोघांनी एकत्र येण्याचे ठरवले. हा वाद एवढा चिघळला दोघांनी एकमेकांना आव्हान केल्यामुळे पोलिसांनी वेळीच महेश गायकवाड यांना त्यांच्या कार्यालयामधूनच ताब्यात घेतले आणि यांचा होणारा वाद पोलिसांच्या मध्यस्थीमुळे पुढील अनर्थ टाळला.

BJP MLA Firing Live Updates : महेश गायकवाड आणि राहुल पाटील जखमी

व्हायरल व्हिडीओमध्ये  गणपत गायकवाड यांनी त्यांच्या बंदुकीतून गोळ्या झाडल्याचा आवाज दिसून येत आहे.  त्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये एकच धावपळ उडाली झाली.  या घटनेमध्ये महेश गायकवाड आणि राहुल पाटील जखमी झाले असून त्यांना ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.  गेल्या अनेक वर्षांपासून महेश गायकवाड आमदार गणपत गायकवाड यांच्यामध्ये वाद विवाद सुरू आहेत.  मग ते जमिनीचे वाद असतील राजकीय वाद असतील हे वाद सुरू आहेत.

BJP MLA Ganpat Gaikwad Live Updates : वाद मिटवण्यासाठी पोलीस स्टेशन गाठलं; रागाच्या भरात पोलीस ठाण्यातच घडला थरार

BJP MLA Ganpat Gaikwad Firing Live Updates : कल्याण तालुक्यातील (Kalyan Crime)  द्वारली गावातील जाधव कुटुंबांचीची जमीन गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad)  यांनी विकत घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी गणपत गायकवाड यांच्यासोबत काही महिला या जमिनीच्या वादातून वाद-विवाद घालत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याच दुसऱ्या दिवशी आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad Shoots Mahesh Gaikwad) यांचे सुपुत्र वैभव गायकवाड हे काल त्या जमिनीवर कंपाऊंडचे काम सुरू असल्यानं पाहणी करण्यासाठी गेले होते, मात्र त्या ठिकाणी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख माजी नगरसेवक महेश गायकवाड (Mahesh Gaikwad)  त्या जागेवरती गेले, जागेवर सुरू असलेलं कंपाउंडचं काम पाडण्यास सुरुवात केली. हा वाद त्या ठिकाणी सुरू असताना आमदार गणपत गायकवाड यांचे सुपुत्र वैभव यांनी वडील आमदार गणपत गायकवाड यांना फोनद्वारे संबंधित घटनेची माहिती दिली.

BJP MLA Firing Live Updates : 50 गुंठ जमिनीच्या वादातून गोळीबार

BJP MLA Firing Live Updates :  उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) भाजप (BJP) आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी शिंदे गटाच्या (Shinde Group) कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार करण्यात आला. 50 गुंठ जमिनीच्या वादातून हा सर्व प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. 

BJP MLA Ganpat Gaikwad : गोळीबारानंतर भाजप आमदार गणपत गायकवाडांची प्रतिक्रिया

BJP Shiv Sena MLA Controversy : भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावरील गोळीबार प्रकरणी प्रसार माध्यमांशी बोलताना आपली बाजू सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गणपत गायकवाड यांनी ''होय, मीच गोळीबार केला'', असं म्हणत गोळीबार केल्याचं मान्य केलं आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना गणपत गायकवाड यांनी सांगितलं की, "पोलीस  स्टेशनमध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की केली. माझ्या जागेचा जबरदस्ती कब्जा घेतला. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील, तर महाराष्ट्रात गुन्हेगारच पैदा होतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसांना एकनाथ शिंदेंनी गुन्हेगार केलं आहे. माझा मनस्ताप झाला, म्हणून मी फायरिंग केली."

BJP MLA Firing Live Updates : भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक

BJP MLA Ganpat Gaikwad Arrest : उल्हासनगरमध्ये भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर पोलिस स्टेशनमध्येच गोळीबार केला. याप्रकरणी पोलिसांकडून गोळीबार करणाऱ्या भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. 

Ganpat Gaikwad : भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून गोळीबार

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) भाजप (BJP) आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी शिंदे गटाच्या (Shinde Group) कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. जखमी महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील (Thane News) ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

पार्श्वभूमी

BJP MLA Firing Live Updates : उल्हासनगरमध्ये भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख यांच्या महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. याप्रकरणी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे.उल्हासनगरमध्ये (UlhasNagar Crime)  भाजप आमदार गणपत गायकवाड  यांच्याकडून गोळीबार करण्यात आला आहे. हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्ये गोळीबार  झाला आहे,  भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला आहे गोळीबारप्रकरणी गणपत गायकवाडसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार जमिनीच्या वादातून घडल्याची माहिती मिळतेय.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.