Pune Holi 2023 :  राज्यभर धुळवड (holi) मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे. मोठ्या जल्लोश करत तर अनेक लोक पार्टी करत धुळवड साजरी करत आहे. मात्र कायम एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या पुण्याच्या दोन आमदारांनी थेट मॉर्निग वॉक करतानाच धुळवड साजरी केलीय भाजपचे आमदार भीमराव तपकीर आणि राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी मॉर्निंग वॉक झाल्यावर लगेच धुळवड साजरी केली. पक्ष, राजकारण बाजूला ठेवत एकमेकांवर रंगांची उधळण केली.


पुण्याच्या तळजाई टेकडीवर दोघेही नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यावेळी दोघेही अचानक एकमेकांसमोर आले. त्यानंतर दोघांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी धुळवड साजरी केली. एकमेकांना गुलाल लावला आणि राजकीय वादावादी दूर ठेवून मजाही केली. या दोघांचाही हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 


दत्ता भरणे हे राष्ट्रवादीचे आमदार असून ते ठाकरे सरकारच्या काळात मंत्रीदेखील होते. मागील अनेक दिवसांपासून ते मतदारसंघात चांगलेच सक्रिय असलेले पाहायला मिळतात शिवाय त्यांचा चांगला जनसंपर्कदेखील आहे आणि भिमराव तपकीर हे भाजपचे आमदार आहे. कसब्याच्या प्रचारात ते सक्रिय होते. त्यांचाही जनसंपर्क दांडगा आहे. दोघेही किंवा दोन्ही आमदारांचे पक्ष एकमेकांवर आरोप करत असतात. दावे-प्रतिदावे केले जातात. मात्र सणासुदीला एकत्र होळी साजरी करत त्यांनी चांगला संदेश दिला आहे.


पुण्यात ठिकठिकाणी धुळवडीचा जल्लोश


पुण्यात आज सर्वत्र रंगोत्सव साजरा होत आहे. अनेक लॉन्समध्ये तर अनेक ग्राऊंडवर धुळवड साजरी केली जात आहे. तरुणांचा धुळवडीचा जल्लोश पाहण्यासारखा आहे. अनेक ठिकाणी रशियन महिलाही या रंगोत्सवात थिरकताना पहायला मिळाल्या. भोई प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दिव्यांग आणि अपंग मुलांसाठी धुळवडीचं आयोजन केलं जातं त्यांचं यंदाचं 27 वं वर्ष होते. या भोई प्रतिष्ठानच्या धुळवडीत शेकडो तरुणांनी गाण्याच्या ताळावर ताल धरला.


नवनिर्वाचित आमदार रविंद्र धंगेकरांची जल्लोषात



कसब्याचे नवे आमदार रविंद्र धंगेकरांनीदेखील मोठ्या जल्लोषात धुळवड साजरी केली. कार्यकर्ते आणि पत्नीवर रंगांची उधळण करत त्यांनी रंगोत्सव साजरा केला. त्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यावेळी त्यांनी सगळ्यांना धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या आणि सगळ्याचे आभारही मानले. काहीच दिवसांंपूर्वी कसब्याचा निकाल लागला. त्यात रविंद्र धंगेकर मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोश केला होता. आजही तसाच जल्लोश त्यांच्या कार्यालयासमोर बघायला मिळाला.