पुणे : कालचा दिवस हा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्वाचा दिवस. सोमवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांविरोधात एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि मंगळवारी त्यावरुन राजकीय धुरळा उडाला. नारायण राणे यांच्या समर्थनार्थ भाजप देखील उतरली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं वाक्य चुकलं नाहीय. थोबाडीत मारली असती हा कॉमन संवाद आहे. एखादी गोष्ट चुकली तर राणेंना आणि त्यांच्या मुलांना सांगण्यासाठी व्यवस्था आहे, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राणे यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. ते पुण्यात बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, फुग्याला भोक तुमच्या पडलं आहे, सामनाला किंमत देत नाही. राऊत साहेब तुमच्यावर पण आरोप झालेत, त्यावर पण बघा, असा सवाल पाटील यांनी केला आहे.
Narayan Rane : नारायण राणेंच्या अटकेची आखणी सोमवारीच, तीही वर्षा बंगल्यावरुन! सूत्रांची माहिती
चंद्रकांत पाटील म्हणाले की, काल दिवसभरात झालेला राजकीय खेळ सूडबुद्धीने झाला हे सिद्ध झालं. आता राणेंना मोकळीक दिली, जामीन दिला. एसपीकडे दोनदा हजेरी लावण्यास सांगितलं. त्यांना नोटीस दिली आणि बोलताना सांभाळून बोललं पाहिजे असं सांगितलं. सत्याचा विजय झाला आहे. राज्य सरकार सारखे कोर्टाच्या थपडा खात आहे, असंही पाटील म्हणाले.
Narayan Rane : 'मगर आसमान में थुंकने वालो...करारा जवाब मिलेगा'; नितेश राणेंचा शिवसेनेला इशारा
पाटील म्हणाले की, राणेंना मुंबईत प्रतिसाद मिळाला, मुंबई हरली तर? मुंबईत पोपटाचा प्राण आहे. भाजप मनामध्ये खुन्नस ठेऊन काम करत नाही. राणेंची तब्येत खराब झालीय, जेवतांना ताट हिसकावून घेतलं हे अमानवीय आहे. पोलिस स्टेशला बसवून ठेवलं, त्यामुळे एक दिवस आराम करतील. लवकरच जन आशीर्वाद यात्रा निघेल, असं ते म्हणाले.
ते म्हणाले की, कायदा सुव्यवस्था प्रश्न बरा आमच्या वेळीच निर्माण होतो. पोलिसांच्या बळावर आणि गुंडांच्या बळावर हे राज्य चाललंय. सगळं ड्राफ्टिंग झालंय, लवकरच परब यांच्या विरोधात याचिका दाखल केली जाईल. सगळी क्लिप राज्याने पाहिली आहे, असंही ते म्हणाले.