मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक ते जामीन मंजुरीच्या पहिल्या राजकीय अंकानंतर आता दुसरा अंक सुरु झाला आहे. नारायण राणे म्हणजे भोकं पडलेला फुगा अशी शिवसेनेनं सामनातून त्यांच्यावर टीका केली तर 'करारा जवाब मिलेगा' असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. 


आमदार नितेश राणेंनी मनोज वाजपेयीच्या एका चित्रपटातील व्हिडीओ शेअर करत एक ट्वीट केलं आहे. त्या ट्वीटमध्ये नितेश राणे म्हणतात की, "मगर आसमान में थुंकने वालों को शायद ये पता नही है, की पलटकर थुंक उन्ही के चेहरे पर गिरेगी.... करारा जवाब मिलेगा... करारा जवाब मिलेगा."


Narayan Rane : आंदोलन...अटक आणि अखेर जामीन; काय घडलं काल दिवसभरात? 


सामनातून टीका
सामनाच्या अग्रलेखात नारायण राणे यांच्यावर सडकून टीक करण्यात आली आहे. सामनामध्ये म्हटलं आहे की,  "नारायण राणे हे कधीच महान किंवा कर्तबगार नव्हते. शिवसेनेत असताना त्यांचे नाव झाले ते सत्तेच्या शिड्या जलदगतीने चढता आल्यामुळेच. राणे यांनी शिवसेना सोडल्यावर त्यांचा लोकसभा आणि विधानसभेत चार वेळा शिवसेनेने दणकून पराभव केला. त्यामुळं राणे यांचे थोडक्यात वर्णन करायचेच झाले तर भोकं पडलेला फुगा असेच करता येईल." 


'नारायण राणे म्हणजे भोकं पडलेला फुगा', 'सामना'तून शिवसेनेचा हल्लाबोल


कालचा दिवस हा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी वादळी दिवस. सोमवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांविरोधात एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि मंगळवारी त्यावरुन राजकीय धुरळा उडाला. त्यामध्ये नारायण राणेंच्या विरोधात आंदोलन ते त्यांना अटक आणि रात्री उशीरा त्यांना मिळालेला जामीन या फिल्मी स्टाईलने राजकीय घडामोडी घडल्या. रायगड कोर्टाकडून नारायण राणेंना जरी जामीन मिळाला असला तरी हा राजकीय धुरळा आजही खाली बसण्याची शक्यता कमी आहे. 


काय म्हणाले होते नारायण राणे? 
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आपल्या  जनआशीर्वाद यात्रेच्या दरम्यान महाड येथे सोमवारी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.  "स्वातंत्र्यदिनाबद्दल माहिती नसणाऱ्यांनी जास्त काही बोलू नये. यांना स्वातंत्र्यदिन कोणता हे माहित नाही. मी असतो तर त्या दिवशी कानाखाली लगावली असती" असं नारायण राणे  यांनी म्हटलं होतं. त्यावरुन मोठा वाद झाला. 


Narayan Rane Gets Bail : नारायण राणे यांना महाड कोर्टाकडून जामीन मंजूर