मुंबई : बिल्कीस बानो प्रकरणातील 11 जणांना सोडून देण्यात आलंय. परंतु, यावरून राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राष्ट्रवादीतर्फे येत्या 27 तारखेला या विरोधात आंदोलन छेडणार असल्याचे राष्ट्रवादी महिला प्रदेश अध्यक्ष विद्या चव्हाण यांनी सांगितलं आहे. तर भाजप नेते मोहित कंबोज यांनी देखील विद्या चव्हाण यांना थेट आव्हानच दिलं आहे. कारण नुकतंच मोहित कंबोज यांनी विद्याताई चव्हाण यांना जय श्रीराम असं ट्विट केलंय.
बिल्कीस बानो प्रकरणातील 11 जणांना सोडून देण्यात आलंय, नुसतंच सोडलं नाही तर त्यांना हार घालत मिठाई भरवण्यात आली. प्रत्येक स्रीचा धर्म हे तिचं चारित्र्य आहे. त्यावर जर कुणी हल्ला केला तो कोणत्याही जाती धर्माचा असो, कुणाला हा अधिकार नाही. मर्दाला लढायचं असेल तर त्याने मैदानात लढावं. महिलांवर बलात्कार करून जर कुणी मोठेपणा मिरवत असेल, तर त्याला आम्ही विरोध करू, असे सांगत राष्ट्रवादीतर्फे येत्या 27 तारखेला या विरोधात आंदोलन छेडणार असल्याचा इशारा विद्या चव्हाण यांनी दिलाय. विद्या चव्हाण यांच्या याच इशाऱ्यावरून मोहित कंबोज यांनी हे ट्विट करत त्यांना आव्हान देलंय अशी शक्यता आहे. कारण त्यांनी ट्विटमध्ये फक्त विद्या चव्हाण यांना जय श्रीराम एवढंच म्हटलंय.
बिल्कीस बानो ही मुस्लिम असली तरी ती आमची बहीण आहे. प्रत्येक स्त्रीचा धर्म हे तिचा चारित्र्य आहे. त्यावर जर कोणी हल्ला केला तो कोणत्याही जाती धर्माचा असो, कुणीही असो. कोणालाही हा अधिकार नाही. मर्दाला लढायचं असेल तर त्याने मैदानात लढावं. महिलांवर बलात्कार करून जर कुणी मोठेपणा मिरवत असेल, तर त्याला आमचा विरोध आहे. येत्या 27 तारखेला या विरोधता आम्ही आंदोलन करणार असल्याचे विद्या चव्हाण यांनी आज सांगीतले आहे.
राष्ट्रवादीचे आमदार (NCP MLA) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू आमदार रोहित पवारांच्या (Rohit Pawar) अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर या कंपनीच्या प्राथमिक चौकशीला ईडीकडून (ED) सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावरून देखील विद्या चव्हाण यांनी आज भाजपवर निशाणा साधला होता. प्रामाणिक लोकांच्या चौकशा करणं, गुन्हेगारांना मंत्रिपदं देणं मोदींचं काम, असा हल्लाबोल विद्या चव्हाण यांनी केला होता. त्यावरून देखील मोहित कंबोज यांनी ट्विट केलं असावं अशी शक्यता वर्तवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
बिल्कीस बानो प्रकरणी 27 तारखेला आंदोलन छेडणार, विद्या चव्हाण यांचा इशारा
Vidya Chavan VS Chitra Wagh : चित्रा वाघ म्हणाल्या छळवादी सासू, माझ्या नादी लागू नका, विद्या चव्हाणांचं जशास तसं उत्तर