मुंबई : राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. तुमच्या नादी लागणारे लंपट असतात. त्यातले आम्हाला समजू नका. चित्राताई, वारंवार "छळवादी सासू" खोटा अपप्रचार तुम्ही करता. छळ केलाच नाही तर होणार कुठून हे तुम्हालाही चांगलंच माहिती आहे. पण तरीही खोटा नाटा पुरावा तरी खुलेआम सादर करा, असे आव्हान विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांना केले आहे.
पुन्हा माझ्या नादी लागू नका, नाहीतर तोंडावर आपटाल, असा धमकी वजा इशारा दोन दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी विद्या चव्हाण यांना ट्विटरवरून दिला होता. त्यानंतर विद्या चव्हाण यांनी आता चित्रा वाघ यांच्या इशाऱ्याला ट्विटरच्या माध्यमातून प्रत्यूत्तर दिले आहे. दोन्ही नेत्यांमध्ये सध्या चांगलचं ट्विटर वॉर सुरू झालं आहे.
काय म्हणाल्या विद्या चव्हाण?
चित्रा वाघ यांनी 19 जैलै रोजी ट्विट करून विद्या चव्हाण यांना छळवादी सासू असे म्हटले होते. त्यानंतर विद्या चव्हाण यांनी त्यांना आज प्रत्यूत्तर दिले आहे. "चित्राताई, वारंवार "छळवादी सासू" खोटा अपप्रचार तुम्ही करता...! छळ केलाच नाही तर होणार कुठून हे तुम्हालाही चांगलंच माहिती आहे...! पण तरीही खोटा नाटा पुरावा तरी खुलेआम सादर करा, असे आवाहन विद्या चव्हाण यांनी केले आहे.
विद्या चव्हाण यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले की, " पुरावा सादर करा नाहीतर तुमच्या खोटारडेपणाचे, इथपर्यंत कसे पोहोचलात, त्यासाठी...! काय काय केले, कोणा कोणाशी संधान साधलं...! हे माहिती आहे. हिम्मत असेल तर या...! "नादी लागू नका", पुन्हा मला धमकी...! तुमच्या नादी लागणारे "लंपट" असतात"...! त्यातले आम्हाला समजू नका."
"सत्याची खडतर वाट चालत असताना पदोपदी अनेक अडथळे आले...! पण न डगमगता इथवर पोहोचले...! तुमचा खोटारडेपणा "सत्याशी" सामना करू शकत नाही...! हेच खरं, असा निशाणा विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांच्यावर साधला आहे.
काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ?
फक्त नाव “विद्या”असून विद्या येत नाही हो, सोलापूर प्रकरणात ना पीडीतेली भेटलो ना आजपर्यंत तिला पाहिलं. पण तुम्हाला मात्र जीभ उचलली की टाळ्याला लावण्याची घाईचं फार. बाकी सुनेला छळणाऱ्या सासूच्या प्रसिद्धीसमोर बाकी सगळं फिकचं नाही का? पुन्हा नादी लागू नका माझ्या तोंडावर आपटाल, असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं होतं.
महत्वाच्या बातम्या