Kirit Somaiya : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधाने ईडीने केलेल्या कारवाईनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच केंद्र विरुद्ध राज्य असा सामना राज्यात सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच आता शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरी आयकर विभागाचे पथक दाखल झालं आहे. दरम्यान, या प्रकरणावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. सोमय्या यांनी ठाकरे सरकारच्या डर्टी डझन नेत्यांची लिस्ट जाहीर केली आहे. यामध्ये आणखी दोन नावांचा समावेश करण्याचे मी विसरलो होतो. यामध्ये यशवंत जाधव, यामिनी जाधव यांचे कुटुंब आणि महापौर किशोरी पेडणेकर यांचे नाव असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. ठाकरे सरकारच्या डर्टी डझन नेत्यांच्या घोटाळ्यांवर कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी मी आज दिल्लीl विविध अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले आहे.
शिवसेनेचे नेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी तपास यंत्रणेकडून चौकशी करण्यात येत आहे. आयकर विभागाकडून यशवंत चव्हाणांच्या घरी छापा टाकण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांचा सपाटा सुरु असल्याचं दिसत आहे. यामध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेते रडावर आहेत. अशातच महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांच्या नेत्यांवरही केंद्रीय तपास यंत्रणांची नजर असून राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांच्या मागे येत्या काही दिवसांत कारवायांचा सपाटा लागणार असल्याचे सूचक वक्तव्य अनेक भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहेत. तसेच, आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेनेचे नगरसेवक यशवंत जाधव यांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणाकडून होणारी चौकशी, शिवसेनेसाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. यशवंत जाधव यांच्या माझगाव येथील घरी आयकर विभागानं छापा घातला आहे. सकाळी सहा वाजता जाधवांच्या घरी आयकर विभागाचं पथक दाखल झालं आहे. दरम्यान, य पथकासोबत CISF पथकंही असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, काल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहेत. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या अटकेनंतर किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या 12 नेत्यांची नावं जाहीर केली आहेत. अनिल देशमुख- नवाब मलिकांनंतर अटकेसाठी कोणाचा नंबर? यावर किरीट सोमय्या यांनी चेंडू शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात टाकला आहे. पत्रकार विचारतात आता कुणाचा नंबर, पण त्यासाठी चिट्ठी काढावी लागेल. ही चिट्ठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी काढावी आणि कोणाला आधी तुरुंगात पाठवायचं हे त्यांनीच ठरवावं, असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी मुंबईत केले होते.
सोमय्यांनी जाहीर केलेल्या नेत्यांची यादी -
1. अनिल परब
2. संजय राऊत
3. सुजित पाटकर
4. भावना गवळी
5. आनंद आडसुळ
6. अजित पवार
७. हसन मुश्रीफ
8. प्रताप सरनाईक
9. रविंद्र वायकर
10. जितेंद्र आव्हाड
11. अनिल देशमुख
12. नवाब मलिक
महत्त्वाच्या बातम्या: