Chitra Wagh : बदलापूरमध्ये घडलेली घटना (Badlapur Incident) ही संवेदनशील आहे. पण या घटनेवर राजकारणी राजकीय पोळ्या भाजत असल्याचे मत भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी व्यक्त केले. या घटनेनंतर सरकारनं जे जे करायला हवं होतं, ते सगळं सरकारने केलं आहे. 1965 साली या शाळेची स्थापना झाली होती. या शाळेत फक्त भाजपची माणसे नाहीत, RSS ची माणसं नाहीयेच, तर बाकी सगळ्या पक्षाची सुद्धा माणसं असल्याचे वाघ म्हणाल्या. जनार्दन घोरपडे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत. हे सुद्धा या शाळेचे अध्यक्ष होते. इतर सुद्धा या संस्थेत उबाठाचे लोक आहेत. पण उद्धव ठाकरे म्हणतात की ही शाळा भाजपची होती असे वाघ म्हणाल्या. उद्धव ठाकरेंचे चटर फटर काहीही बोलतात. त्यांना काही माहिती नसते असंही वाघ म्हणाल्या. 


बदलापूरमधील लोकांना, पालकांना मी भेटले होते. ते म्हणाले साडेदहा वाजेपर्यंत आम्ही तिथे आंदोलन करत होतो. त्यानंतर झुंडीच्या झुंडी तिथे आल्या होत्या. तिथे लाडकी बहीण नको असे फ्लेक्स दिसले. हे कसे दिसले हे कळत नाही. आता उज्वल निकम सरकारी वकील नको असे विरोधक म्हणतात. आता लोकं म्हणतात त्यांचा आग्रह असतो की उज्वल निकम वकील आम्हाला हवेत असेही चित्रा वाघ म्हणाल्या. 'बदलापूर घटना ये तो बस विरोधको के लिए बहाणा है, लाडकी बहीण योजना पर निशान है', घाटकोपर घटनेवर विरोधकांचे राजकारण होत असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. 


आधी उज्वल निकम चालायचे आता का नको?


उद्धव ठाकरेंच्या काळात काँग्रेसचा काळात उज्वल निकम यांनी केस घेतल्या होत्या. आधी उज्वल निकम चालायचे आता मग का नको? कपिल सिब्बल चालतात मग उज्वल निकम का चालत नाहीत? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला. उद्धव ठाकरेंचे चटर फटर काहीही बोलतात. त्यांना काही माहिती नसते. उज्वल निकम का नको? का घाबरताय? असा सवाल देखील वाघ यांनी केला.  


महाराष्ट्र अशांत कसा करायचा? याचं षडयंत्र सुरु


शक्ती कायद्याचं काय झालं विचारताय. त्याची एक प्रोसेस असते. राष्ट्र्पती यांच्याकडे हा कायदा पाठवला. त्यात काही बदल सुचवले, त्यानुसार काही बदल केले जातील आणि कायदा आणला जाईल असे वाघ म्हणाल्या. महाराष्ट्र अशांत कसा करायचा? बदनाम कसा करायचा? याच षडयंत्र हे करत असल्याचा आरोप वाघ यांनी विरोधकांवर केला. 


सुप्रिया सुळेंसह उद्धव ठाकरेंवर टीका


नाना पटोले म्हणतात, या घटनेची धग जाणवयाला हवी. प्रणिती शिंदे म्हणतात आंदोलकांनी आग लावायला पाहिजे होती. सुप्रिया सुळे यांचे सुळे दाखवायचे वेगळे आणि आतले वेगळे आहेत. सुप्रिया सुळे यांनी सुरक्षेसाठी निर्भया पथकतील गाड्या त्यांचं सरकार असताना वापरल्या आणि आता सुप्रिया ताई म्हणतात मला सुरक्षा नको असेही वाघ म्हणाल्या. साकीनाका घटना आठवत असेल, नांदेडची घटना, डोंबिवलीची घटना, चंद्रपूरची घटना, दिशा सालियनची घटना याची संशयची सुई आदित्य ठाकरेंवर होती. हे सगळं त्यांच्या सरकारमध्ये झाल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. मी या सगळ्यांबद्दल महा अधिवेशन बोलवावं अशी मागणी उद्धव ठाकरेंकडे केली होती. पण त्यांनी सरकार असताना काही केलं नाही असे वाघ म्हणाल्या. 


महत्वाच्या बातम्या:


उद्याचा महाराष्ट्र बंद संस्कृती विरुद्ध विकृती, दुपारी दोन वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळा; उद्धव ठाकरेंचे आवाहन