मुंबई : कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही हे सांगण्यासाठी मी उद्धवजींसारखा कंपाउंडर किंवा डॉक्टर नाही म्हणजेच उद्धवजींसारखा डॉक्टर आणि संजय राऊत यांच्या सारखा कंपाउंडर नाही असं वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी औरंगाबादेत केला आहे.  ते भाजपा कार्यकर्ते जगदीश सिद्ध यांच्या धावणी मोहल्ला येथील एका कार्यक्रमात बोलत होते.


गेल्या काही दिवसांपासून तीस वर्षे एकत्र संसार केलेल्या शिवसेना आणि भाजपा यांचं नातं विळा आणि ओंबी सारखा झालाय. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. पहिली लाट संपली असे दोन-तीन महिने लोकांना वाटलं. जनजीवन व्यवस्थित झालं. त्यानंतर दुसरी लाट आली त्यामुळे ज्याला आपण सामाजिक जीवन म्हणतो ते सगळं बंद आहे. दुसऱ्याला लाटेनंतर सर्व काही टप्पा आहे. उद्योग बंद आहे ,व्यापार बंद आहे शाळा बंद आहे, राजकीय जीवन बंद आहे. आता थोडं असं वातावरण झालंय,  लसीचे दोन डोस  घेतलेले देशभरामध्ये 65 कोटी लोक आहेत. केंद्राला सारखा दोष देत देत, सगळ्यात जास्त लसीकरण महाराष्ट्रात झाले असा हे दावा करतात.


 तिसरी लाट येणारच नाही असं भाकीत करण्यासाठी मी उद्धवजींसारखा डॉक्टर किंवा कंपाउंडर नाही म्हणजे, उद्धवजी सरकार डॉक्टर आणि संजय राऊत यांच्या सारखा कंपाऊंडर नाही असं त्यांनी वक्तव्य केलं .याबरोबरच तिसरी लाट, ती येऊ पण शकते .कोरोना फक्त उद्धवजींशी बोलतो. आता दुसरी लाट बऱ्यापैकी आवाक्यात आली आहे .त्यामुळे  जनजीवन सुरू करण्याशिवाय आता पर्याय नाही असं देखील पाटील म्हणाले. 


हरिभाऊ बागडे यांनी औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांना शाळा सुरू करण्याबाबत विनंती केली आहे. शाळा आता सुरू करायला हरकत नाही. शाळा बंद असल्याने मुलांच्या जीवनावर परिणाम होतोय. मुलं शाळा विसरून चालली आहेत, त्यामुळे लवकरात लवकर शाळा सुरू करण्याची गरज असल्याचे देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ते आज औरंगाबादच्या दौऱ्यावर होते, शहरातील भाजप कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन ती त्यांचे भेट घेत होते.