मुंबई :  भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. 45 दिवसांपासून राज्यातल्या जनतेनं मुख्यमंत्र्यांना पाहिलं नाही. त्यामुळं कुणाकडे तरी चार्ज द्या..हवं तर आदित्य ठाकरेंकडे चार्ज द्या अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे.  बाबासाहेब पुरंदरे यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करावेत यासाठीची फाईल राज्य सरकारकडे पाच तास पडून होती अशी टीकाही त्यांनी या वेळी केली. 


चंद्रकांत पाटील म्हणाले, आरोग्यच्या कारणावरून राज्यावर अन्याय करू नका. 45 दिवसांपासून राज्यातल्या जनतेनं मुख्यमंत्र्यांना पाहिलं नाही.  सामान्य माणसाला सहानुभूती ठीक आहे परंतु एका नेत्याला नाही चालत आणि यामुळेच तो नेता होतो. सहानुभूतीने राज्य नाही चालवले जात नाही.  एक दिवस परदेशात जायचे असेल तरी मुख्यमंत्र्यांना चार्ज द्यावा लागतो. परंतु मुख्यमंत्र्यांचा कोणावर विश्वासच नाही. कोणावर विश्वास नसेल तर तुमच्या विश्वासू आदित्य ठाकरेंकडे चार्ज द्या.  बाबासाहेब पुरंदरे यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करावेत  यासाठीची फाईल राज्य सरकारकडे  सहीसाठी  पाच तास पडून होती. बाबासाहेब पुरंदरेवर ही वेळ येत असेल तर  तर इतरांच काय? त्यामुळ महाराष्ट्राला रामभरोसे ठेवता येणार नाही. 


या अगोदर देखील चंद्रकांत पाटील यांनी  राष्ट्रपती राजवट लावण्यासाठीची सगळी यादी पूर्ण झाली आहे. सगळी कारणं यांनी पूर्ण केली आहेत., अशी टीका महाविकासआघाडीवर केली आहे.  चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद (Chandrakant Patil Press ) घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. "जे जे त्रासदायी होईल ते यांना नको आहे. तपास यंत्रणा आणि भाजपचा कोणताही संबध नाही. लोक विचार करून आपलं मत ठरवतात. कोण आजारी आहे. कोण जेलमध्ये आहे. राज्यात सगळा गोंधळच सुरू आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जनतेसमोर जा मग कळेल जनता कुणाला स्वीकारते?" असे आवाहन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला केले. 


महत्वाच्या बातम्या


Chandrakant Patil vs Girish Bapat : अमित शाह यांच्यासमोरच चंद्रकांत पाटील आणि गिरीश बापट यांच्यात शीतयुद्ध


चंद्रकांत पाटील यांचे अजब वक्तव्य, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू वोट बॅंक विकसित केली, वाजपेयी-मोदींकडून कळस!


संप मागे घेतला नाही तर; तर मी स्वत: एसटी चालवत सेवा सुरू करणार, चंद्रकांत पाटलांचा इशारा