मुंबई : नगरविकास खात्याच्या नगररचना पद भरतीच्या जाहिरातीवरुन भाजप आक्रमक झाली आहे. जाहिरातीत उमेदवार राज्यातील रहिवासी असावा, ही अट काढल्यानं आता भाजपनं महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं आहे.


पूर्वी ज्या वेळी अशा जाहिराती निघायचा तेव्हा उमेदवार राज्यातील रहिवासी असणे ही अट गरजेची होती.   महाभकास आघाडीचं मराठी प्रेम बेगडी असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकरांनी केली आहे. 2018 मध्ये फडणवीस सरकारच्या काळात ही अट होती ती का वगळली याचे उत्तर सरकारने द्यावे अन्यथा ही अट पूर्णस्थापित करा अन्यथा कोर्टात जाऊ असा इशारा अतुल भातखळकर यांनी दिला आहे. 


राज्यातील नगरविकास खात्याच्या नगररचनाकार या पदाकरिता काढलेल्या जाहिरातीतील उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असला पाहिजे ही अट वगळण्यात आली असल्यावरून आमदार भातखळकर यांनी ठाकरे सरकारला त्याबाबत जाब विचारला आहे. तसेच रोजगाराकरिता महाराष्ट्रातल्या लोकांना प्राधान्य देऊ अशा फुशारक्या मारणार्‍या सरकारने नगररचनाकारांच्या संदर्भातील 2018 सालची उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असला पाहिजे  ही अट का वगळली या प्रश्नाचे उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं आणि ही अट पुन्हा एकदा त्या ठिकाणी आणली पाहिजे अशी मागणीही आमदार भातखळकर यांनी केली आहे.  


महत्त्वाच्या बातम्या:




LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha