CCTV : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
एबीपी माझा वेब टीम | 12 May 2018 10:58 AM (IST)
प्रदीप रामचंदानी यांचा मुलगा पालिकेचा मोठा ठेकेदार आहे.
उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेत भाजपच्या नगरसेवकाची चोरी पकडली गेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कपाटातून फाईल चोरी करतानाचा नगरसेवक प्रदीप रामचंदानी हे कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. प्रदीप रामचंदानी हे उल्हासनगर महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे स्वीकृत नगरसेवक आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कपाटतून फाईल काढून शर्टात टाकून प्रदीप रामचंदानी यांनी चोरली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याने समोर आला. प्रदीप रामचंदानी यांचा मुलगा पालिकेचा मोठा ठेकेदार आहे. 10 मे रोजीची ही घटना असून, मात्र काल रात्री सीसीटीव्ही समोर आले. उल्हासनगर महापालिकेच्या वतीने आज गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता आहे. पाहा व्हिडीओ :