BJP and Shiv Sena : "शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवराळ भाषा वापरू नये. शिवाय जे सत्तेत आहेत त्यांनी उलट सुलट बोलू नये. दोन्ही पक्षांतील वाद मिटले पाहिजेत. त्यासाठी मी प्रयत्न करणार असून भाजप आणि शिवसेनेला एकत्र यावं लागेल, असे मत केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. 


रामदास आठवले यांनी आज पुण्यात माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत या वादाबाबत चर्चा करणार आहे. दोन्ही पक्षांतील हा वाद मिटला पाहिजे. अनेक वर्षांची मैत्री दुष्मनीमध्ये बदलली आहे. ती परत मैत्रीत बदलली पाहिजे. राजकारणात काही होऊ शकतं आणि भाजप शिवसेना एकत्र येऊन महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे, असेही रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले. 


 तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज भेट झाली. त्यावरही रामदास आठवले यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, के. चंद्रशेखर राव यांना सर्वांना भेटण्याचा आधिकर आहे. त्यांना जी भूमिका मांडायची आहे ती मांडू द्या. ममता बॅनर्जी भेटल्या, त्यामुळे चंद्रशेखर राव उलट सुलट बोलत आहेत. त्यांचं काम तेलंगणापर्यंत मर्यादित आहे. ते भेटले तर चांगलंच आहे. उद्धव ठाकरे यांनी पण भेटले पाहिजे. तिसरी आघाडी झाली तरी आम्हाला फरक पडणार नाही."


आगामी पुणे महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला 20 ते 25 जागा मिळाल्या पाहिजेत, असे मतही यावेळी रामदास आठवले यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, पुणे महानगर पालिका निवणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाला किमान 20 ते 25 जागा मिळाल्या पाहिजेत. येत्या एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महानगरपालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे, अशी माहिती रामदास आठवले यांनी यावेळी दिली.  
 
दरम्यान, रामदास आठवले यांनी यावेळी होत असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये एनडीएला यश मिळेल असेही सांगितले. पंजाबमध्ये भाजपला 117 जागा मिळतील असा अंदाज त्यांनी यावेळी वर्तवला आहे.  


महत्वाच्या बातम्या