नागपूर : भाजपच्या देशभरातील कार्यकर्त्यांनी आज उपोषण केलं. पण भाजपने केलेलं हे उपोषण खरंच आहे की उपोषणाच्या नावाखाली निव्वळ दिखावा? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
नागपूरच्या संविधान चौकात भाजप कार्यकर्त्यांचं एक दिवसीय उपोषण सुरु आहे. मात्र उपोषण करणारे कार्यकर्ते चक्क गुटखा, खर्रा खात वेळ ढकलताना पाहायला मिळाले.
मंडपातून हळूच काढता पाय घेत अनेक जण धूम्रपान करुन पुन्हा मंडपाचा मार्ग धरतानाही दिसले. पण यावेळी ‘माझा’च्या कॅमेऱ्याची करडी नजर पडताच अनेकांनी पुन्हा कॅमेऱ्यासमोर येणंच टाळलं.
दुसरीकडे, नागपूरमधील भाजप नेत्यांनी असा काही प्रकार झाला नसल्याचं म्हटलं आहे. जे लोकं कॅमेऱ्यात कैद झाले ते बाहेरील लोकं होतं. ते आमचे कार्यकर्ते नव्हते असा दावा भाजप नेत्यांनी केला आहे.
दरम्यान, राजकीय पक्षांनी उपोषण करणं हे दुर्दैवी असल्याचं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी व्यक्त केलं आहे. तसंच उपोषणाचं शस्त्र बोथट करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
संबंधित बातम्या :
मोदींचं दिल्लीत, तर फडणवीसांचं मुंबईत उपोषण
नागपुरात भाजप कार्यकर्त्यांचं गुटखा, खर्रा खाऊन उपोषण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Apr 2018 05:28 PM (IST)
भाजपच्या देशभरातील कार्यकर्त्यांनी आज उपोषण केलं. पण भाजपने केलेलं हे उपोषण खरंच आहे की उपोषणाच्या नावाखाली निव्वळ दिखावा? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -