गडाच्या मालकीच्या जागेशिवाय अन्यत्र सभा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गडाच्या पायथ्याशी गेट नंबर 22 वर पंकजांच्या सभेला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे भगवान गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याची परंपरा खंडीत झाली आहे.
नामदेव शास्त्रींच्या विरोधानंतरही भारजवाडी ग्रामपंचायतीच्या भागात मेळाव्याला परवानगी मागणाऱ्या कृती समितीला जिल्हा प्रशासनाने रेड सिग्नल दाखवला होता. कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला होता. त्यामुळे दसऱ्याच्या पूर्वसंध्येलाच पंकजा मुंडेंच्या मेळाव्यावर प्रश्नचिन्हं उभं राहिलं होतं. मात्र हे सावट अखेर दूर झालं आहे.
भगवान गडाच्या आतमध्ये दसरा मेळाव्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली असली तरी हेलिपॅड परिसरात आता हा मेळावा पार पडेल. जिल्हा प्रशासनाचा हा निर्णय पंकजा मुंडेंच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
EXCLUSIVE: नामदेव शास्त्रींसोबत कोणताही वाद नाहीः पंकजा मुंडे
भगवान गडाच्या हद्दीत 40 गुंठे जागा भारजवाडी ग्रामपंचायतीची असून, तिथे कृती समितीकडून दसरा मेळाव्याला परवानगी मागण्यात आली होती. ग्रामपंचायतीने 6 तारखेला जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केला होता.
भगवान गडावरील दसरा मेळाव्याआधी पंकजा मुंडेंना दणका
भगवान बाबा आणि गडाचा अपमान होईल असं कोणतंही कृत्य कोणी करणार नाही. तसंच महंत नामदेव शास्त्री आणि आपल्यात कसलाही वाद नाही. त्यामुळे गडावर येणाऱ्या लाखो भाविकांशी संवाद साधायला नक्की आवडेल. भगवान गड हा राजकीय भाषणासाठी नाही, त्यामुळे गडावर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा संबंधच नाही, असं स्पष्टीकरण पंकजा मुंडेंनी एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत म्हटलं होतं. या मुलाखतीनंतर हेलिपॅड परिसरात सभेला मान्यता मिळाली आहे.