आठवड्यानंतरही भुजबळ फार्म हाऊसची मोजदाद सुरुच
एबीपी माझा वेब टीम | 01 Sep 2016 07:28 AM (IST)
नाशिक: आठवड्याभरानंतरही नाशिकमधल्या भुजबळ फार्मवरच्या संपत्तीची मोजदाद सुरुच आहे. या आलिशान फार्ममध्ये देश-विदेशातल्या दुर्मिळ मूर्ती, अनेक शोभेच्या वस्तू आहेत. त्यामुळे आज मुंबईतल्या ३ तज्ज्ञांना या वस्तूंचं मूल्यांकन ठरवण्यासाठी बोलावण्यात आलं आहे. वेगवेगळ्या गैरव्यवहारात भुजबळांनी जो पैसा कमावला त्यातली मोठी रक्कम या फार्मसाठी खर्च झाल्याचा आरोप एसीबीचा आहे.. त्यामुळे या फार्मचं गेल्या आठवड्याभरापासून एसीबी मूल्यांकन करतंय. ६ एकरावर पसरलेल्या या भव्य फार्मची किंमत अंदाजे शंभर कोटींच्या घरात आहे.