भिवंडी : भिवंडीत विक्रीसाठी आणलेल्या पाच वर्षांच्या चिमुरडीची सुटका करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तिचा सांभाळ करणाऱ्या आयानंच तिला विकण्यासाठी आणलं होतं.


शोभा बन्सी गायकवाड असं या 50 वर्षीय आरोपी महिलेचं नाव आहे. कल्याणच्या कोळसेवाडीत महिला एका कुटुंबाकडे संबंधित पाच वर्षांच्या मुलीचा सांभाळ करायची. फिरायला नेण्याच्या बहाण्याने महिलेनं मुलीला कल्याणहून पळवून भिवंडीत आणलं.

भिवंडीत नारपोली देवजीनगर परिसरात 20 हजार रुपयांना विकण्याचा प्रयत्न केला. याची माहिती पोलिसांना मिळताच सापळा रचून पोलिसांनी तिला अटक केली आणि मुलीचीही सुटका केली. महिलेला 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.