Bhiwandi Accident : भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावर (Mumbai Nashik highway) भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. मुंबई नाशिक महामार्गावर पडघ्याजवळ साईधाराच्या समोर दुचाकी व ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला असून, एक जण जखमी झाला आहे. मृतांमध्ये वडीलांसह सहा वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. तर आई गंभीर जखमी असल्याने उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केलं आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा अपघात घडला आहे. दुचाकीला मागून ठोकर दिल्याने हा अपघात घडला आहे. सईम खोत (48) व मरियम खोत (6) अशी मृतांची नावे आहेत, तर सुबी खोत असे जखमी महिलेचे नाव आहे.
महत्वाच्या बातम्या: