अमरावतीत उद्या विदर्भस्तरीय सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेला परवानगी मिळणार की नाही, याकडे भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर अमरावती पोलिसांनी या सभेला परवानगी दिली.
या सभेला फक्त विदर्भच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातून भीम आर्मीचे कार्यकर्ते लाखोंच्या संख्येने सहभागी होतील, असा अंदाज आयोजकांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.
चंद्रशेखर आझाद यांची राज्यातील ही पहिलीच सभा आहे. पोलिसांनी दिलेल्या अटींचं पालन करताना आझाद काय बोलतील, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. चंद्रशेखर आझाद आदल्या दिवशीपासूनच अमरावतीत डेरेदाखल झाले आहेत.
बडनेरा ते अमरावतीपर्यंत भीम आर्मीच्या वतीने भव्य मोटार सायकल रॅली काढणार आहे. दिवसभर त्यांचे ठिकठिकाणी विविध कार्यक्रम होतील. दुपारी अडीच वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे.