बीड : प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या आश्वासनाची आठवण विरोधक अनेक वेळा करुन देतात. ते प्रत्यक्षात उतरेल-न उतरेल बीडमध्ये काही शेतकऱ्यांच्या खात्यात शे-हजार रुपये होत आहेत. विशेष म्हणजे हे पैसे कुठून आले, याचा माग लागत नाहीये.
बीड जिल्ह्यातील पाटोदामधल्या दासखेड गावातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अचानक पाचशे, एक हजार किंवा दोन हजार रुपये जमा झाले आहेत. गेल्या दिवसांपासून ही रक्कम जमा होत असल्याचं समजल्यानंतर ग्राहकही अवाक झाले आहेत.
हे पैसे 'बीड एनआयसी'च्या नावे जमा होत आहेत. आतापर्यंत जवळपास दोनशे ते अडीचशे जणांच्या खात्यात अशाप्रकारे पैसे जमा झाले, पण हे पैसे नेमके कशाचे आहेत, हे मात्र अद्याप प्रशासनाकडून समजलेलं नाही.
विशेष म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावे शेती नाही, अशा ग्राहकांच्या खात्यावर पैसे जमा होत असल्याने हे पैसे कुठले आहेत याविषयी चर्चा रंगलेली आहे.
बीडमध्ये लोकांच्या खात्यात जमा होत आहेत पैसे!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Jan 2019 07:05 PM (IST)
बीडमधील दासखेड गावातील एसबीआयच्या काही ग्राहकांच्या खात्यात अचानक पैसे जमा होत आहेत, कोणाच्या खात्यात पाचशे, तर कोणाच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाले आहेत. हे पैसे कुठून आले, याविषयी सर्वांच्याच मनात संभ्रम आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -