Jairam Ramesh : भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) ही कन्याकुमारीपासून सुरु झाली आहे. ही यात्रा कितीही अडचणी आणि अडथळे आले तरी काश्मीरपर्यंत जाणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी व्यक्त केला. नायगावमध्ये जयराम रमेश यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. भारत जोडोमुळे काँग्रेस संघटनेला नव संजीवनी मिळाली असल्याचे ते म्हणाले. भारत जोडो यात्रेविषयी भाजप नेहमीच टीका टिप्पणी करत आहे. ही यात्रा थांबवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही रमेश यांनी केला. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर (Modi government) टीका केली. 


आज राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील तिसरा दिवस आहे. आज सकाळी शंकरनगरकडून ही यात्रा नायगावकडे मार्गस्थ झाली. सध्या यात्रा साडेतीन तासांचा प्रवास करुन नायगावमध्ये दाखल झाली आहे.  दुपारी चार वाजता ही यात्रा पुढे मार्गक्रमण करणार आहे. त्यापूर्वी काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर टीका केली.  पंतप्रधानांच्या निती आणि नियतीनुसार भारत तोडला जात असल्याचे रमेश म्हणाले.


उद्या नांदेडमध्ये भव्य सभेचं आयोजन  


उद्या (9 नोव्हेंबर) नांदेडमध्ये राहुल गांधी यांच्या भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. भारत जोडो यात्रा 3 हजार 500 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार आहे. ज्यामध्ये उद्या या यात्रेचे अर्धे अंतर पूर्ण होणार असल्याचे जयराम रमेश म्हणाले. सध्या देशात महागाई, बेरोजगारी तसेच सामाजिक ध्रुवीकरण वाढलं आहे. राजकारण करुन द्वेष वाढवला जात आहे. भाजपमुळं हुकूमशाही वाढत आहे. भाजप आणि RSS देशातील समाज तोडण्याचा प्रयत्न करत करत असल्याचे रमेश म्हणाले. भारत जोडो यात्रे विषयी भाजप नेहमीच टीका-टिप्पणी करत आहेत. ही यात्रा थांबवण्याचा प्रयत्न होत आहे. कारण या यात्रेची भाजपला भीती वाटत असल्याचे रमेश यांनी सांगितलं.


17 नोव्हेंबरला शेगावला राहुल गांधी पत्रकार परिषद 


आपल्या देशातील पंतप्रधानांनी गेल्या आठ वर्षापासून आजपर्यंत एकही पत्रकार परिषद घेतली नसल्याचे रमेश म्हणाले. दरम्यान, यावेळी जयराम रमेश यांच्या हस्ते भारत जोडो यात्रेचं मराठी थीम गीत काँग्रेसकडून रिलीज करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रवक्ते अतुल लोंढे, सचिन सावंत उपस्थित होते. 17 नोव्हेंबरला शेगावला राहुल गांधी पत्रकार परिषद घेणार आहेत. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांची ही सहावी पत्रकार परिषद असणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Ashok Chavan :अशोक चव्हाणांचा राजकीय वारस कोण? भारत जोडो यात्रेत चर्चेला उधाण