अहमदनगर : महाराष्ट्राचे मांझी म्हणून ज्यांची ओळख आहे, ज्यांनी आपल्या गावासाठी अख्खा डोंगर पोखरून रस्ता केला, त्याच भापकर गुरुजींनी जेव्हा गावात दारुबंदीसाठी पुढाकार घेतला, तेव्हा गावगुंडांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.


एवढं होऊनही पोलिसांनी फक्त एका आरोपीला अटक केली. भापकर गुरुजींनी सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे. मात्र अद्यापपर्यंत त्यांना सुरक्षा पुरवण्यात आलेली नाही.

अहमदनगर जिल्ह्यात दारुचं एवढं साम्राज्य कुणाच्या जीवावर फोफावतंय. याचविषयी एबीपी माझाने भापकर गुरुजी आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी बातचीत केली.

‘’... अन्यथा गाव सोडण्याशिवाय पर्याय नाही’’

समाजसेवा करणाऱ्या 85 वर्षांच्या व्यक्तीवर गावगुंडांनी हल्ला केला. तरीही दुर्दैवं असं की या हल्लेखोरांपैकी केवळ एकाला अटक झाली आहे, तर बाकी सर्व जण गावात मोकाट फिरत आहेत. व्यसनमुक्तीसाठी पुढाकार घेतला, एवढाच भापकर गुरुजींचा अपराध होता. त्यामुळे गावगुडांनी त्यांच्यावर हल्ला केला.

केवळ महसुलाचा विचार करु नका, युवाशक्ती सांभाळा : अण्णा हजारे

पाहा व्हिडिओ :


संबंधित बातमी :  महाराष्ट्राच्या मांझीवर हल्ला, भापकर गुरुजींना गावगुंडांची मारहाण