शेतकऱ्यांच्या प्रतिकात्मक प्रेतयात्रेच्या तयारीत असलेला शेतकरी ताब्यात
एबीपी माझा वेब टीम | 21 May 2017 10:43 AM (IST)
मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढणारे शेतकरी विजय जाधव यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विजय जाधव आज विधान भवन गेटवर निदर्शनं करणार होते, त्यापूर्वीच मध्यरात्री त्यांना ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आझाद मैदानात पोलिसांच्या देखरेखीत निदर्शनं सुरु आहेत. नाशिक येथे शिवसेनेच्या शेतकरी अधिवेशनात विजय जाधव आस्थी कलश घेऊन सहभागी झाले होते. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी विजय जाधव मुंबईत दाखल झाले आहेत. सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी ते विधान भवन गेटवर निदर्शनं करणार होते. मात्र मध्यरात्री मरिन ड्राईव्ह पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.