दानवेंवर टीका करताना अशोक चव्हाणांचीही जीभ घसरली
एबीपी माझा वेब टीम | 21 May 2017 07:42 AM (IST)
मालेगाव : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंवर टीका करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची जीभ घसरली. मालेगाव महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत चव्हाण यांच्या भाषेची पातळी घसरली. काही दिवसांआधी दानवेंनी शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरले होते. त्याच वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी टीका करताना अशोक चव्हाण यांनीही भाषेची मर्यादा ओलांडली. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मालेगावमध्ये 24 तारखेला होत असलेल्या निवडणुकीच्या प्रचारासाठी अशोक चव्हाण यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी हिंदी भाषेतून भाषण करत केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. केंद्रातील आणि राज्यातील सरकार हे सरकार नसून सावकार असल्याची टीका करत हे सरकार गरीबांना लुटण्याचं काम करीत असल्याचा घणाघात अशोक चव्हाणांनी केला. एमआयएम, समाजवादी पक्ष हे भाजपची बी टीम असल्याचा टोला त्यांनी लगावला. भाजपला मदतीसाठी हे पक्ष निवडणुकीत उतरले असून भाजपला रोखण्याची ताकद फक्त काँग्रेसमध्ये आहे. त्याची सुरुवात मालेगावमधून होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाहा व्हिडिओ : संबंधित बातम्या :