भंडारा : महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या तक्रारीवरून विनयभंगाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आलेल्या आमदार चरण वाघमारे यांना पोलिसांनी अटक केली आहे. तुमसर न्यायालयाने दहा ऑक्टोबरपर्यंत आमदार चरण वाघमारे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांद्वारे निष्पक्ष तपास न झाल्याने नाराज  होऊन विनयभंग प्रकरणी जामीन घेण्यास वाघमारे यांनी नकार दिल्यानंतर दहा ऑक्टोबरपर्यंत वाघमारे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे .


त्यामुळे आता आमदार वाघमारे यांचा दहा ऑक्टोबरपर्यंत तुरुंगात मुक्काम राहणार आहे. दरम्यान भाजपच्या नाराज नेत्यांची आमदार चरण वाघमारे यांची तिकीट कापण्यासाठी केलेला प्रयत्न असल्याच्या आरोप चरण वाघमारे यांच्या समर्थकांनी केला असून त्यांच्या निषेध म्हणून तुमसर, मोहाडी बंदची हाक वाघमारे समर्थकांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख चार ऑक्टोबर असल्याने आमदारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, चरण वाघमारे यांनी आरोप खोटे असून जो पर्यंत माझ्या विरुद्ध गुन्हा सिद्ध होत नाही तो पर्यंत जामीन घेणार नसल्याचे आमदार वाघमारे यांनी कोर्टासमोर सांगितले. वाघमारे यांना 10 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्याने संतापलेल्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघात टायर जाळून निषेध व्यक्त केला आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून जिल्हाला पोलीस छावणीचे रूप आले आहे.


कामगार सुरक्षा किट वाटप कार्यक्रमात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकाला शिवीगाळ करून त्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी भाजपचे आमदार चरण वाघमारे यांच्यासह शहराध्यक्ष अनिल जिभकाटे यांना भंडारा पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांविरोधात 18 तारखेला तुमसर येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा गुन्हा सिद्ध झाल्याने त्यांना शनिवारी सकाळी अटक करण्यात आल.





दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या आमदारावर महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या उमेदवारीवर ही प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.