OBC Reservation: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानं ओबीसी मतदार नाराज झालेत. येत्या 21 डिसेंबरला होणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय. भंडारा जिल्ह्याच्या पिपरी पुर्नवसन या गावात नागरिकांनी अशा पाट्या लावत निषेध केलाय. यातच ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानं भंडाऱ्यातील ओबीसी प्रवर्गातील एका महिलेनं निवडणुकीत उभा राहिलेल्या पतीलाच मत न देण्याचा निर्धार केलाय. यामुळं उमेदवार पतीची पंचाईत झालीय. घरातूनच मत मिळणार नसल्यानं उमेदवार स्वत: ओबीसीच्यां पाट्या लावा चळवळीत शामिल झाले आहेत. 


ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानं आता पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवार असलेल्या नवऱ्याला ही मतदान करणार नाही, असा ठाम पवित्रा एका उमेदवारच्या ओबीसी प्रवर्गातिल पत्नीने घेतलाय. घरातून मत मिळणार नसल्यानं निवडणूक लढवून काय करू? असा प्रश्न त्या ओबीसी उमेदवारास पडला आहे. हे ओबीसी कुटुंब दूसरे तीसरे नसुन भंडारा जिल्ह्यातील पिपरी पुनर्वसन येथील कातोरे कुटुंब आहेत. भाऊ कातोरे हे गोपेवाड़ा पंचायत समितिच्या निवडणुकीत कॉग्रेस पक्षा कढून उभे आहेत. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानं ओबीसी प्रवर्गानं मतदानावर बहिष्कार टाकल्यानं आपली पत्नी सुद्धा मतदान करण्यार नसल्यानं त्यांना हा प्रश्न पडलाय. घरातूनच मत मिळणार नसेल तर निवडणूक लढवून काय करू? असा सवाल त्यांना पडलाय. त्यांमुळे ओबीसीच्यां पाट्या लावा चळवळीत स्वता शामिल होऊन त्यांनी स्वता च्यां घरावर निषेध पाटी लावत आपला रोष ही व्यक्त केलाय. त्यामुळे चक्क एका उमेदवारानं आपल्या घरी निवडणूक बहिष्काराची पाटी लावल्यानं आता भंडारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर पेच अधिकच वाढत चाललाय.


स्थानिक स्वराज्य संस्थांमधील होऊ घातलेल्या ओबीसी संवर्गातील जागेवरील निवडणुकीला राज्य निवडणूक आयोगाकडून स्थगिती मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. राज्यातील 106 नगरपंचायतमध्ये 1802 जागांसाठी निवडणूक होणार होती. आता त्यापैकी ओबीसींच्या 400 जागांच्या निवडणुकीला स्थगिती मिळणार आहे.


भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 13 व पंचायत समितीच्या 25 तर नगर पंचायतींच्या 13 ओबीसी जागांवरील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. यानंतर ओबीसी संघटना आक्रमक झाल्या असून आरक्षण नाही तर मतदान नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. या निर्णयाला जिल्ह्यातील ओबीसी समाजानंही पाठिंबा दिला आहे. आम्हाला आरक्षण नाही तर केवळ आम्ही मतदानच करायला आहोत का संतप्त सवाल येथील ओबीसी बांधव विचारत आहे. त्यामुळे आम्हाला मत मागायला येऊ नये असा इशाराच त्यांनी देऊन टाकला आहे. ओबीसी समाजाच्या या भूमिकेमुळं उमेदवारांमध्ये मात्र अस्वस्थता पाहायला मिळत आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा-