Bhandara : आयुर्वेदिक औषध विक्रीच्या नावावर हरियाणातील गुंड महाराष्ट्रात दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहेत का? असा प्रश्न निर्माण करणारी घटना भंडाऱ्याच्या लाखांदुरात समोर आली आहे. लाखांदुरात आयुर्वेदिक औषध आणि रुग्णांवर उपचार करणाऱ्या दोघांवर हरियाणातून दोन वाहनातून आलेल्या गुंड प्रवृत्तीच्या टोळीनं बेसबॉल स्टिक आणि दगडांनी मारहाण करीत दोघांवर प्राणघातक हल्ला केला आहे. यात पोलिसांनी लाखांदूरच्या नागरिकांच्या मदतीनं पाच जणांना अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी अमरावतीत सुद्धा अशीच घटना उघडकीस आली होती

Continues below advertisement

आयुर्वेदिक औषध विक्रीचा व्यवसाय ठराविक भागात करायचा आणि त्या बदल्यात हप्ता द्यायचा

आयुर्वेदिक औषध विक्रीचा व्यवसाय ठराविक भागात करायचा आणि त्या बदल्यात हप्ता द्यायचा. या मागणीला घेऊन हा धुडगूस घालण्यात आला. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी 2 ऑक्टोंबरला अमरावती जिल्ह्यातील परतवाडा इथं आयुर्वेदिक औषध विक्री करणाऱ्या गुंडांनी अशाच प्रकारे हल्ला करून धमकी देत खंडणी मागितल्याच प्रकरण घडल्यानं हे प्रकरण पोलिसात पोहचलं होत. त्यामुळे हरियाणातील आयुर्वेदिक औषध विक्रेत्या गुंडांनी महाराष्ट्रात आता धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होतं आहे. परप्रांतीय महाराष्ट्रात येऊन असा धुमाकूळ घालत असून येथील नागरिकांमध्ये दहशत माजविण्याचा प्रयत्न करत असल्यानं परप्रांतीयांच्या कॅरेक्टर सर्टिफिकेटची आता गरज भासू लागल्याचं बोललं जात आहे. लाखांदूर येथे अमृतपाल सिंग मलकित सिंग (32) असं मारहाणीत जखमी झालेल्याचं नावं आहे. अमृतपाल सिंग हा त्याचा मित्र धीरज शर्मा याच्यासोबत लाखांदुरात आयुर्वेदिक औषध विक्री आणि रुग्णांवर उपचार करतो. 

परप्रांतीय महाराष्ट्रात येऊन असा धुमाकूळ घालत असल्यानं नागरिक संतप्त

अटक केलेल्यांमध्ये दीपक अमरपाल सिंग (28), लवली कुमार रामबिर सिंह (21), सुरेश प्रेमचंद कुमार (36), अमरकुमार बलवान कुमार (23), अभिषेक रोषिपाल (23) या पाच जणांना अटक केली आहे. आरोपींनी वापरलेलं एक वाहन पोलिसांनी जप्त केलं असून उर्वरित फरार आरोपींचा लाखांदूर पोलीस शोध घेत आहे. परप्रांतीय महाराष्ट्रात येऊन असा धुमाकूळ घालत असून येथील नागरिकांमध्ये दहशत माजविण्याचा प्रयत्न करत असल्यानं परप्रांतीय लोकांबद्दल काही भागात रोष् व्यक्त होताना दिसत आहे. दोन जणांना मारहाण केल्यामुळं भंडारा जिल्ह्यातील वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

Nashik Crime: नाशकात मध्यरात्री गोळीबाराचा थरार, धारदार शस्त्र हातात घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न; 'कायद्याच्या बालेकिल्ल्यात' गुन्हेगारी सुरूच