Nashik Crime News : नाशिक जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी (Nashik Crime) हा सध्या एक मुख्य चर्चेचा विषय ठरला आहे. पोलिसांनी (Nashik Police) गुन्हेगारांच्या मुसक्या वळण्याची मोहीम हाती घेतली असताना अशातच आत नाशिकच्या शरणपूर रोड (Sharanpur Road) परिसरात रात्रीच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. यात हवेत गोळीबार करत धारदार शस्त्राने घरांवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. तर यात गोळीबारकरून दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. मात्र हा गोळीबार नेमका कोणी आणि कुठल्या कारणाने केला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला असून पोलिसांनी एका संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हातात धारदार शस्त्र घेऊन पळत असताना पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं. विकी गुंजाळ अस अटक केलेल्या संशयताचे नाव आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांकडून गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र या घटनेने शहरात खळबळ उडाली असून वाढती गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान आता पोलिसांपुढे असणार आहे.

Raigad Crime : चोरीला गेलेला बैल हवाय? जन्माचा दाखला द्या? पोलिसांच्या या अजब प्रश्नाने मालक चक्रावला

माझा बैल चोरीला गेलाय, अशी तक्रार घेऊन गेलेल्या एका बैल मालकाला पोलिसांकडून चक्क त्याचा दाखला द्या, अशी उरमट विचारणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार रायगडच्या नेरळ मधून समोर आलाय. कर्जत तालुक्यातील अंजप गावातील तानाजी माळी या शेतकऱ्याचा बैल रविवारी पहाटे चोरट्यांनी घराच्या अंगणातूनच पळवून नेला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन ते चार गोतस्कर पावाचे तुकडे टाकून बैलाला खेचत आलिशान वाहनात बसवताना स्पष्ट दिसत आहेत. सकाळी उठल्यावर माळी यांना बैल चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ नेरळ मधील कशेळे पोलिस चौकीत तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली, मात्र तेथे तक्रार दाखल करून न घेतल्यामुळे शेतकरी कर्जत पोलिस ठाण्यात आला.

तेथे पोलिसांनी शेतकऱ्याला चोरीला गेलेल्या बैलाचा जन्मदाखला आणा, असे सांगताच शेतकरी भांबावून गेला. शेतकऱ्यासोबत घडलेल्या या प्रकारामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तालुक्यात गोतस्करांचा दबदबा वाढल्याची तक्रार अनेकांनी केली आहे.मात्र आम्ही न्याय मागायचा कुणाकडे असा सवाल हे शेतकरी करत आहेत.

आणखी वाचा