पोलीस शिपाई मारहाण: भाजप आमदार रामचंद्र अवसरे पोलिसांना शरण
एबीपी माझा वेब टीम | 20 Aug 2016 10:43 AM (IST)
भंडारा: भंडाऱ्यात पोलिस शिपायाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले भाजपचे आमदार रामचंद्र अवसरे आज पोलिस स्थानकात हजर झाले. तुमसर पोलिस स्थानकात काही वेळेपूर्वी अवसरे पोलिसांना शरण गेले. तिरंगा रॅलीदरम्यान अवसरे यांच्या चालकाला पोलिसांनी धक्काबुक्की केली. त्यानंतर भडकलेल्या अवसरेंनी शिपायालाच मारहाण केली. हा सर्व प्रकार पोलिस स्थानकातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. सुरुवातीला अवसरेंनी या प्रकरणी कोणतिही दिलगीरी व्यक्त करायला नकार दिला होता. पण अखेर आज 3 दिवसानंतर अवसरे पोलिसांना शरण गेले आहेत.