भंडारा : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये ( SNCU ) काल मध्य रात्री लागलेल्या आगीमुळे 10 नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. यामध्ये रावणवाडी येथील वंदना सिडाम यांच्या मुलीचा देखील होरपळून मृत्यू झाला आहे. ही बातमी सिडाम यांच्या कुटुंबियांना माहिती होताच सर्व सुन्न झाले.
भंडारा जिल्ह्यातील रावणवाडी येथील वंदना सिडाम यांची प्रसूती 3 जानेवारीला पहेला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात झाली होती. मात्र त्यांच्या मुलीचे वजन कमी असल्याने बाळाला जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला डाक्टरांनी दिला होता. मात्र महिलेचा पती हा पुणे येथे नोकरीला असल्याने सासू सासऱ्यांनी बाळाला भंडारा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. बाळ अतिशय नाजूक असल्याने त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. मात्र रात्रीच्या सुमारास जी दुर्दैवी घटना घडली यामध्ये सिडाम यांच्या बाळाचा देखील मृत्यू झाला आहे.
रात्रीच्या सुमारास जेव्हा रुग्णालयात आग लागली असतांना बाळाच्या आईला याची माहिती सुद्धा देण्यात आली नव्हती. पण वंदना यांनी माझं बाळ कुठे आहे? याची विचारणा केली असताना त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली होती.अखेर दिवस उजडताच तुमच्या बाळाचा मृत्यू झाला असल्याच्या दुःखद धक्काच रुग्णालय प्रशासनाने दिला होता.
या बातमीमुळे वंदना पूर्णतः खचली होती. अखेर गोर गरीब लोकांच्या मदतीला कोण धावणार असल्याने आईला गावी पाठविण्यात आले. मात्र हा धक्का इतका मोठा होता की, वंदना सिडाम यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल करण्यात आले आहे. ही घटना दुर्देवी असून जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी मृतकाच्या आईने केली आहे. तर आज मृत मुलांच्या परिवाराला शासनाकडून पाच लाखाची मदत देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
भंडारा रुग्णालय आग : अनेक माता-पित्यांनी पोटच्या बाळांना मनभरून पाहिलंही नव्हतं
WEB EXCLUSIVE | नवजात शिशू केंद्रात काय खबरदारी घ्यावी?