Bhandara Gondia Loksabha: केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा(Amit Shah) हे उद्या 6 एप्रिलला गोंदिया (Gondia) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते. महायुतीचे भाजपचे उमेदवार सुनील मेंढे (Sunil Mendhe) यांच्या प्रचाराकरिता गोंदिया जिल्ह्यात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला अमित शहा हे स्वत: उपस्थित राहून संबोधित करणार होते. मात्र काही कारणास्तव अमित शहा यांचा नियोजित गोंदिया दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या सभेचे नियोजन करण्यात आले होते. शिवाय सभास्थळी जय्यत तयारी देखील करण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी ही सभा रद्द करण्यात आली असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे ही सभा रद्द होण्यामागील नेमकं कारण काय असा प्रश्नही यानिमित्याने उपस्थित केला जात आहे.


यामागील कारणही भाजपचे प्रदेश प्रवक्ते विश्वास पाठक यांनी सांगितले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रकृती बिघडली असल्याने ही सभा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे उद्या भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभा रद्द करण्यात आल्याची माहितीही विश्वास पाठक यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.


नियोजित दौरा तडकाफडकी रद्द


महायुतीचे भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचाराकरिता केंद्रीय गृहमंत्री आणि  भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा हे उद्या 6 एप्रिलला गोंदिया येथे येणार होते. गोंदियात उद्या सुनील मेंढे यांच्या वतीने भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याकरिता या सभेची जय्यत तयारीही पूर्ण झाली होती. परंतु अमित शहा यांच्या प्रकृतीच्या कारणावरून ते गोंदिया येथील सभेला उपस्थित राहू शकणार नसल्यामुळे 6 एप्रिल रोजी होणारी त्यांची गोंदिया येथील सभा रद्द करण्यात आली आहे. तसेच पुढील सभेचे नियोजन 12 किंवा 13 तारखेला होणार असल्याची माहिती विश्वास पाठक यांनी दिली आहे.


10 एप्रिलला पंतप्रधानांचा विदर्भ दौरा 


आमित शाह यांचा संभाव्य दौरा तूर्तास रद्द करण्यात आला असला तरी भाजपचे स्टार प्रचारक आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराराष्ट्रतील विदर्भातून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात करणार आहेत. येत्या 10 एप्रिलला पंतप्रधान मोदी आपल्या दौऱ्याची सुरुवात रामटेक लोकसभा मतदारसंघापासून करणार असून कन्हान येथे पंतप्रधानांची जाहीर सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. 'अबकी बार चारसो पार'चा नारा देणाऱ्या भाजपने प्रत्येक मतदारसंघावर आपले लक्ष केंद्रित केले असून त्या अनुषंगाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात येत्या 19 एप्रिलला पूर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.


त्यात नागपूर, गडचिरोली, भंडारा -गोंदिया, रामटेक आणि  चंद्रपूर मतदारसंघाचा समावेश आहे. त्यात पंतप्रधान मोदी यांनी विदर्भातील आपल्या नियोजित दौऱ्याचा नारळ रामटेकपासून फोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामागील कारण म्हणजे रामटेक हे प्रभू श्रीरामाच्या वास्तव्याने पुनित झालेले शहर आहे. येथील गडमंदिर देशभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे मोदी यांनी या सभेचे स्थान निवडताना रामटेकला अधिक प्राधान्य दिल्याचे बोलले जात आहे.


इतर महत्वाच्या बातम्या